मिहानमध्ये आता इंटरनेट पर्याय वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:13 AM2021-09-16T04:13:40+5:302021-09-16T04:13:40+5:30
नागपूर : मिहानमधील गुंतवणूकदार कंपन्यांनी इंटरनेट गतीबाबत जुलैमध्ये एमएडीसीकडे तक्रार केल्यानंतर आता इंटरनेटचे पर्याय वाढले आहेत. कोरोना काळात अनेक ...
नागपूर : मिहानमधील गुंतवणूकदार कंपन्यांनी इंटरनेट गतीबाबत जुलैमध्ये एमएडीसीकडे तक्रार केल्यानंतर आता इंटरनेटचे पर्याय वाढले आहेत.
कोरोना काळात अनेक कंपन्यांचे काम ठप्प पडले होते, तर मिहान-सेझमध्ये काही आयटी कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे; पण या कंपन्यांना इंटरनेटच्या संथ गतीचा सामना करावा लागत होता. या कंपन्यांनी जुलैमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) तक्रार केली होती. आता या ठिकाणी फायबर केबलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या व्यतिरिक्त पाच अन्य कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
या संदर्भात एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले की, काही आयटी कंपन्यांनी जुलैमध्ये इंटरनेटची गती संथ असल्याच्या कारणाने निर्यातीवर परिणाम होत असल्याचे तक्रार केली होती. हा चिंताजनक विषय होता. हा विषय तत्काळ निकाली काढून ऑगस्ट महिन्यात इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचे ‘एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट’ काढण्यात आले. यामध्ये पाच बोलीकर्त्यांची निवड करण्यात आली. आता मिहानमध्ये गुंतवणूकदार कंपन्या पसंतीचे सर्व्हिस प्रोव्हायडर आणि हायस्पीड इंटरनेट सुविधा निवडू शकतात. या पाच कंपन्यांमध्ये तीन खासगी आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत.