ईव्हीएम सील करताना अडथळा

By admin | Published: February 18, 2017 02:36 AM2017-02-18T02:36:27+5:302017-02-18T02:36:27+5:30

ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे नाव व चिन्ह सील करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे

Interruption of sealing EVM | ईव्हीएम सील करताना अडथळा

ईव्हीएम सील करताना अडथळा

Next

अपक्ष उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे नाव व चिन्ह सील करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रभाग क्रमांक ९ ड मधून अपक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार अनिल खापर्डे यांनी ईव्हीएम मशीन वाढवण्याची मागणी करीत मनपा कर्मचाऱ्यांना पाहून घेण्याची धमकी दिली. यामुळे संबंधित उमेदवाराविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर येथील दादासाहेब कन्नमवार सभागृहात ईव्हीएम मशीनच्या सिलींगचे काम सुरू होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी ११ वाजता खापर्डे तिथे पोहोचले. त्यांनी त्यांच्या प्रभागात बॅलेट युनिट वाढवण्याची मागणी केली. परंतु तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खापर्डे यांनी निवडणुकीच्या दिवशी पाहून घेईन, असे सांगितले. यानंतर राजेश वानखेडेने खापर्डे यांच्या विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खापर्डे यांच्यावर ३५३ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे एका प्रभागात चार उमेदवार आहेत. उमेदवारांच्या संख्येनुसार ईव्हीएम मशीन लावली जात आहे. जास्तीत जास्त एक कंट्रोल युनिट आणि चार बॅलेट युनिट तर कमीतकमी एक कंट्रोल युनिट व दोन बॅलेट युनिट लावले जात आहेत. परंतु अनेक पक्षातील नेते मनपा निवडणूक विभागात येऊन प्रभागात बॅलेट युनिट वाढवण्याची मागणी करीत आहेत.(प्रतिनिधी)

भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर गुन्हा दाखल
मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचारही वाढला आहे. अशा वेळी आचारसंहिता उल्लंघनाचे प्रमाणही वाढले आहे. शुक्रवारी विविध झोन अंतर्गत भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धंतोली ठाण्यात भाजपा व काँग्रेस तर जरीपटका ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहोचविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपक्ष कृष्णा डाहाने यांच्याविरुद्ध पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आचारसंहिता उल्लंघनाच्या ७६ प्रकरणात १३० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title: Interruption of sealing EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.