घुसमटमुक्त चिलपिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:22+5:302021-06-28T04:07:22+5:30
चला..दोस्तहो मैदानावर शाळा सुरू असताना बच्चे कंपनींला बुट्टी मारण्याची भारीच हौस. शाळेला चटांगणी देऊन मुले शेजारीपाजारी असणाऱ्या पटांगणात भारी ...
चला..दोस्तहो मैदानावर
शाळा सुरू असताना बच्चे कंपनींला बुट्टी मारण्याची भारीच हौस. शाळेला चटांगणी देऊन मुले शेजारीपाजारी असणाऱ्या पटांगणात भारी धिंगामस्ती करत होती. कोरोना संक्रमणाने घरी राहण्याची मुलांची हौस भागवली जरूर. मात्र, मोकळ्या हवेत श्वास घेण्यास आसुसलेली मुले बंदिस्त राहू शकत नाहीत. गेल्या पंधरा-सोळा महिन्यात या घुसमटीमुळे मुले चिडचिडी झाली आहेत. घराबाहेर पडणे नाही, शाळेला जाणे नाही, कौटूंबिक सोहळे बंद भेटीगाठी नाहीत की मित्रांसोबत खेळणे नाही, सारेच बंद पडलेले. मुलांची ही मानसिक स्थिती पाहून पालकही चिंतेत आहेत. संक्रमणाचा ज्वर ओसरल्यामुळे पालकांनीही बच्चे कंपनींना मोकळीक दिली आणि मुले घराशेजारीच अशी दंगामस्ती करण्यास मश्गुल झाले. सीताबर्डी परिसरातील फुटबॉल खेळताना असे मुलांना बघणे सुखावह वाटते.
छायाचित्र - मुकेश कुकडे
..........