पुलक मंच, अमरस्वरुप फाऊंडेशनचे रक्तदानात अमूल्य योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:38+5:302021-07-12T04:06:38+5:30
नागपूर : स्वतंत्रता संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'लोकमत'च्या वतीने 'लोकमत ...
नागपूर : स्वतंत्रता संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'लोकमत'च्या वतीने 'लोकमत रक्ताचं नातं' या उपक्रमांतर्गत राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमात अखिल भारतीय पुलक मंच परिवार व अमरस्वरूप फाऊंडेशन यांच्यासह सहयोगी संस्थांनी अमूल्य योगदान दिले. या संस्थांच्या मदतीने रविवारी नंदनवनमधील महावीरनगरस्थित पुलक मंचच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या शिबिरात ५० नागरिकांनी उत्साहात रक्तदान केले.
महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती संजय महाजन, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षक विजय मुनीश्वर, भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटीचे राष्ट्रीय महामंत्री संतोष जैन पेंढारी, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय सदस्य रजनीश जैन, श्री. पार्श्वप्रभू दिगंबर जैन सैतवाल मंदिर संस्थेचे महामंत्री दिलीप राखे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, धंतोलीचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी. बी. भोसले, भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे राज्य महामंत्री जुनैद खान, असलम खान, सर्व मानव सेवा संघाचे अध्यक्ष सुभाष कोटेचा, श्री. दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाल)चे अध्यक्ष विनय सावलकर, श्री. महावीर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भुसारी, महावीरनगर सुधार समितीचे अध्यक्ष अनिल गवारे, अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत तुपकर, बेटिया शक्ती फाऊंडेशनचे श्रीधर आडे, रुद्रावतार जैन मित्र परिवारचे अमोल भुसारी, मंगेश सव्वालाखे यांनी प्रमुख अतिथी म्हणून शिबिराला भेट दिली. सर्वांनी लोकमतच्या उपक्रमाची व शिबिर आयोजक संस्थांची प्रशंसा केली.
डॉ. हेडगेवार रक्तपेढीने रक्त संकलनाकरिता सहकार्य केले. आयोजनातील सहयोगी संस्थांमध्ये अखिल दिगंबर सैतवाल संस्था, श्री. दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाल), फिटनेस फॉरएव्हर स्पोर्ट्स अकॅडमी, रुद्रावतार जैन मित्र परिवार, बेटिया शक्ती फाऊंडेशन, श्री. महावीर गृहनिर्माण सहकारी संस्था, माझे महावीरनगर सोशल ग्रुप व महावीरनगर सुधार समितीचा समावेश होता. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुलक मंच परिवार के राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड, शरद मचाले, कुलभूषण डहाळे, प्रकाश उदापूरकर, प्रशांत भुसारी, संदीप पोहरे, उमेश फुलंबरकर, गौरव अवथनकर, नरेश मचाले, दिनेश सावलकर, गौरव शहाकार, रमेश उदेपूरकर, दिलीप सावलकर, सुहास खरे, संजय नखाते, सुनील फुरसुले, प्रकाश वाकेकर, अमोल भुसारी, नीलेश विटाळकर, अभय बेलसरे, प्रशांत मानेकर, अतुल महात्मे, सचिन नखाते, वृषभ आगरकर, राजेश जैन, जितेंद्र गडेकर, कल्पना सावलकर, प्रतिभा नखाते, प्रिया बंड, शीतल थेरे, कला मंचाचे नरेंद्र सतीजा, सुनील जैसवाल, आशीष पलेरिया, प्रशांत सवाने, सूदर्शन भुसारी आदींनी परिश्रम घेतले.
---------------
यांनी केले रक्तदान
ओ-पॉझिटिव्ह
अमित विटाळकर, पुष्पेश सैनी, गीतेंद्र थेरे, दीपक मारवाडी, संजय घरडे, गुणवंत निनावे, मंगला पाटील, स्मृती सवाने, मोहित शहारे, अक्षय चतुरकर, रितेश बोबडे, सुनील बंड, पवन चौधरी, कपिल गोहाटे.
ए-पॉझिटिव्ह
सचिन जैन, उदय मलगुलवार, राजेश थुलकर, कपिल टिपटे, नरेश शहारे, प्रज्वल वाकेकर, महावीर कापसे, हेमंत सावरकर, पराग पोहरे, अभय बेलसरे, नीकेश गजभिये, प्रतिक गव्हाणे,
एबी-पॉझिटिव्ह
महेश पवार, सचिन भोयर, कुणाल गडेकर, आकाश मरघडे, हरीश गभणे, यश टांक,
बी-पॉझिटिव्ह
शुभांगी लांबाडे, शुभम खोत, गौरव मिराशे, सुदर्शन भुसारी, संदीप कोहाटे, नीलेश नायक, सौरभ गडेकर, सूरज मेश्राम, सौरभ ठाकरे, रुपेश पळसापुरे, राहुल पळसापुरे, किरण प्रांजळे, पियाली दोडेवार, रोहित जरीया, हेमंत मेंढे.