राफेल घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी करा : संजय सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:02 AM2018-09-23T01:02:21+5:302018-09-23T01:03:49+5:30

अनिल अंबानी यांना राफेलचा कंत्राट मोदी सरकारने दिला. अंबानी यांना फायदा पोहचविण्यासाठी एका विमानवर तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासातील संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी व संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे नेते खा. संजय सिंग यांनी केली.

Investigate Rafael scam through JPC: Sanjay Singh | राफेल घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी करा : संजय सिंग

राफेल घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी करा : संजय सिंग

Next
ठळक मुद्देसंरक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनिल अंबानी यांना राफेलचा कंत्राट मोदी सरकारने दिला. अंबानी यांना फायदा पोहचविण्यासाठी एका विमानवर तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासातील संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी व संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे नेते खा. संजय सिंग यांनी केली.
राफेल घोटाळ्यावर सगळ्यात आधी आम आदमी पार्टीने आवाज उचलला, अनिल अंबानीच्या कंपनीला फायदा देण्यासाठी घोटाळा केला गेला.
सिंग म्हणाले, विमान खरेदीसाठी फक्त अंबानी यांचा एकमेव प्रस्ताव आला होता, असे सांगून फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी या घटाळ्याची पुष्टी केली आहे. २०१५ मध्ये कंत्राट झाल्यानंतर आजवर एकही राफेल विमान भारतात आलेले नाही. यूपीएच्या काळात राफेल विमान ज्या उपकरणासाहित येणार होते तेच आताही येणार आहे. मग किंमत कशी वाढली, एवढे कमिशन कुणाकडे गेले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अंबानीविरुद्ध पत्रकार परिषद घेतली म्हणून आपल्यावर पाच हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. मात्र, यामुळे आपण भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणे थांबविणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. विजय मल्ल्याच्या प्रकरणातही वित्तमंत्री अरुण जेटली यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी सांगितले. या वेळी आपच्या प्रवक्त्या प्रीती मेमन उपस्थित होत्या.

तीन राज्यात लढणार,लोकसभेचीही तयारी
छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थान या तीनही राज्यातील विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी लढणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय लोकसभेच्या निवडक ८० ते १०० जागा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये बसपा व अजित सिंग एकत्र येऊन लढत आहेत. याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपालाच होईल, असा धोकाही त्यांनी वर्तविला. शत्रुघ्न सिन्हा हे नेहमीच आपच्या व्यासपीठावर येत राहिले आहेत, यात नवे काही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Investigate Rafael scam through JPC: Sanjay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.