सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील अनुदानप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा; ॲड. धर्मपाल मेश्राम यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 08:49 PM2023-06-28T20:49:03+5:302023-06-28T20:50:42+5:30

Nagpur News राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील या गैरव्यवहाराप्रकरणी विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करून चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Investigate through SIT in the case of grants in Micro and Small Industries Department; Adv. Dharmapal Meshram's demand to the Deputy Chief Minister | सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील अनुदानप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा; ॲड. धर्मपाल मेश्राम यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील अनुदानप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा; ॲड. धर्मपाल मेश्राम यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

googlenewsNext

नागपूर. राज्यातील अनेक विभागीय उद्योग सह संचालकांद्वारे मर्जीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमबाह्य नेमणूक करीत अधिकारी, कर्मचारी व उद्योजकांच्या संगनमताने शासनाची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकरणावर योग्य कार्यवाही होण्याच्या दृष्टीने राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील या गैरव्यवहाराप्रकरणी विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करून चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अशाच प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार यवतमाळ येथे काही दिवसांपूर्वी झाल्याचे ॲड. मेश्राम यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यवतमाळ येथील एका प्रकरणात शासनाकडून विविध योजनेअंतर्गत उद्योग वाढीसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानाच्या रक्कमेची तब्बल ४ कोटी ३८ लाख ८७ हजार रुपयांची हेराफेरी झाल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. या प्रकरणात लिपिक व टंकलेखक अजय राठोड व पाच उद्योजक यांच्या संगनमतातून हा घोटाळा झाल्याची तक्रार यवतमाळ येथील पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असल्याचेही ॲड. मेश्राम यांनी सांगितले.

अनेक विभागीय उद्योग सहसंचालकांनी, कर्मचारी पाखरणीद्वारे आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करत अशा शासकीय अनुदानाची लुट केली असल्याची शक्यता असून अशा प्रकरणांमध्ये विभागातील अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी अनेक प्रकरणे अमरावती व नागपूर विभागात झाल्याचेही नाकारता येत नाही, असेही ॲड. मेश्राम यांनी नमूद केले आहे.

Web Title: Investigate through SIT in the case of grants in Micro and Small Industries Department; Adv. Dharmapal Meshram's demand to the Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.