सीबीआयची पुरातन विभागात तपासणी

By Admin | Published: July 17, 2016 01:45 AM2016-07-17T01:45:46+5:302016-07-17T01:45:46+5:30

पुरातन विभागाच्या मुख्यालयासह विदर्भातील अनेक कार्यालयात केंद्रीय गुन्हे अण्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी तपासणी केली.

Investigation in the CBI's antique department | सीबीआयची पुरातन विभागात तपासणी

सीबीआयची पुरातन विभागात तपासणी

googlenewsNext

कागदपत्रे घेतली ताब्यात : स्थानिक अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ
नागपूर : पुरातन विभागाच्या मुख्यालयासह विदर्भातील अनेक कार्यालयात केंद्रीय गुन्हे अण्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी तपासणी केली. विशेष म्हणजे, तपासणी करून दोन दिवस झाले असले तरी यासंदर्भात सीबीआयच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचे टाळले.
पुरातन विभागाचे नागपुरात मुख्यालय असून विदर्भातील सर्वच जिल्ह्यात कार्यक्षेत्र विस्तारले आहे. गुरुवारी सीबीआयच्या बाहेरून आलेल्या चमूने एकाचवेळी नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम येथील पुरातन विभागाच्या कार्यालयात छापे घालून तपासणी केली. या तपासणीनंतर महत्त्वपूर्ण कागदपत्रेही ताब्यात घेतली. कोट्यवधींच्या गैरप्रकाराच्या तक्रारीवरून ही तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. गुरुवारी आणि शुक्रवारी या संदर्भात सीबीआयच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगली. उपअधीक्षक एस. मिश्रा यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना ‘केवळ तपासणी करण्यात आली. चौकशी सुरू आहे’, इतकीच जुजबी माहिती दिली. याबाबतची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढची माहिती देऊ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Investigation in the CBI's antique department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.