तांदूळ घोटाळ्याची चौकशी होणार

By admin | Published: February 23, 2016 03:32 AM2016-02-23T03:32:03+5:302016-02-23T03:32:03+5:30

खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळतो का, याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना ४

The investigation of the rice scam is going on | तांदूळ घोटाळ्याची चौकशी होणार

तांदूळ घोटाळ्याची चौकशी होणार

Next

जितेंद्र ढवळे ल्ल नागपूर
खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळतो का, याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना ४ जानेवारी २०१६ रोजी शालेय पोषण आहाराच्या नोंदणी रजिस्टरमध्ये गडबड दिसली का, मग शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर कोणती कारवाई केली, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आठ दिवसांत करण्याचे आदेश नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी सोमवारी दिले.
लोकमतने दि. २२ रोजी ‘ विद्यार्थ्यांच्या खिचडीवर भ्रष्टाचाराचे लोणी’ या मथळ्यातील वृत्त प्रकाशित करीत कलोडे विद्यालयाला सरकारकडून पुरवठा झालेल्या तांदळाच्या नोंदणीत गोलमाल असल्याप्रकरणी शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत विभागीय शिक्षण उपसंचालकांनी तत्काळ चौकशीचे आदेश जिल्हा परिषद (माध्यमिक)चे शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुढे यांना दिले आहेत.
विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी देशभरात शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. मात्र सरकारी यंत्रणा आणि काही संस्थांच्या खासगी हितामुळे या योजनेची ‘खिचडी’ होत आहे.

तर हे आधी तपासा
४४ जानेवारी २०१६ रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना कलोडे विद्यालयातील शालेय पोषण आहाराच्या नोंदणी रजिस्टरमध्ये तफावत आढळली होती का ?
४मग शिक्षणाधिकाऱ्यांनी याप्रकरणी कोणती कारवाई केली ?
४२००४-२००५ या शैक्षणिक वर्षांत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदूळ शिजवून वाटप केल्याबाबतच्या देयकात जुलै-०४ ते मार्च ०५ या कालावधीत प्रत्यक्ष हजेरी पटावरील उपस्थितीपेक्षा तांदूळ शिजवून वाटप करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक दर्शविण्यात आली होती का ?
४यात देयकामध्ये दर्शविण्यात आलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती ही हजेरी पटावरील उपस्थितीपेक्षा ४४ ने अधिक होती का?
४२६ नोव्हेंबर २००४ रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असतानाही शाळेने तांदूळ शिजविल्याचे देयक सादर केले होते आणि अनुदानही स्वीकारले होते. हे खरे आहे का ? सार्वजनिक सुटीच्या दिवशी पोषण आहार वितरित करता येतो का ?

Web Title: The investigation of the rice scam is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.