श्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणुकीचा खटला २७ पासून

By Admin | Published: January 20, 2016 04:01 AM2016-01-20T04:01:01+5:302016-01-20T04:01:01+5:30

श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणुकीचा खटला २७ जानेवारीपासून एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.

Investigator fraud case from Sreesuya 27 | श्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणुकीचा खटला २७ पासून

श्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणुकीचा खटला २७ पासून

googlenewsNext

नागपूर : श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणुकीचा खटला २७ जानेवारीपासून एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात प्रारंभ होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तूर्त २७ ते २९ पर्यंत साक्षीपुरावे नोंदवण्यासाठी तीन दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. या साठी सहा साक्षीदारांना समन्स पाठविण्यात आलेले आहे.
समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी हे दोघे या महाघोटाळ्याचे म्होरके आहेत. त्यांनी मुदत ठेवींवर त्रैमासिक साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखवून २००५ ते १४ सप्टेंबर २०१३ या काळात ५०९२ गुंतवणूकदारांकडून २४७ कोटी १४ लाख ५९ हजार ४४४ रुपयांच्या ठेवी गोळ्या केल्या होत्या. सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित गोविंद मोरे यांनी पाच लाखांच्या फसवणुकीबाबत तक्रार नोंदवताच राणा प्रतापनगर पोलिसांनी समीर जोशी आणि पल्लवी जोशी यांच्याविरुद्ध १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ३४ आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्तसंबंध) संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे पथकाकडे तपास सोपविण्यात आला होता. पुढे पुन्हा भादंविच्या ४०९, २०१, १२० ब , भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याच्या ४५ एस, ५८ ब अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. समीरला १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. तर पल्लवी ही २४ आॅक्टोबर २०१३ रोजी न्यायालयात शरण आली होती. सध्या पल्लवी जामिनावर आहे.
या प्रकरणात समीर जोशी, पल्लवी जोशी यांच्यासह बिझनेस असोसिएटस् श्रीकांत प्रभुणे, निशिकांत मायी, दिलीप डांगे, मोहन पितळे, मुकुंद पितळे, नितीन केसकर, शंतनू कुऱ्हेकर, आनंद जहागीरदार, मनोज तत्वादी, भूषण पाटील आणि सुशील अरासपुरे, असे एकूण १३ आरोपी आहेत. या आरोपींपैकी समीर जोशी, तत्वादी आणि दोन एजंट हे कारागृहात आहे. इतर जामिनावर आहेत.
आतापर्यंत १२४४ गुंतवणूकदार पुढे आले असून फसवणुकीची रक्कम १०० कोटींच्यावर गेलेली आहे. आतापर्यंत अंदाजे ३० कोटींवर मालमत्ताही जप्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. सुभाष घारे, अ‍ॅड. देशपांडे तर सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील बी. एम. करडे बाजू मांडणार आहेत. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विष्णूपंत भोये हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Investigator fraud case from Sreesuya 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.