गुंतवणुकीचा संभ्रम दूर करणारा ‘निवेश महाकुंभ’ आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:06 IST2018-03-23T23:05:39+5:302018-03-23T23:06:07+5:30
सर्वोत्तम आर्थिक नियोजनासोबतच आर्थिक लक्ष्य गाठण्याबाबत गुंतवणूकदारांना मार्गदर्शनाचा ‘निवेश महाकुंभ’ कार्यक्रम शनिवार, २४ मार्चला होत आहे. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडने ही संधी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

गुंतवणुकीचा संभ्रम दूर करणारा ‘निवेश महाकुंभ’ आज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोत्तम आर्थिक नियोजनासोबतच आर्थिक लक्ष्य गाठण्याबाबत गुंतवणूकदारांना मार्गदर्शनाचा ‘निवेश महाकुंभ’ कार्यक्रम शनिवार, २४ मार्चला होत आहे. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडने ही संधी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
गुंतवणूक बाजाराच्या या महासागरात सर्वसामान्य गुंतवणूकदार सैरभैर असतो. अशा या सैरभैर गुंतवणूकदारासाठी म्युच्युअल फंड सर्वोत्तम पर्याय आहे. यासोबतच एकूणच सर्वोत्तम परताव्याच्या गुंतवणुकीसाठी काय केले जावे, हे गुंतवणूकदारांना माहीत नसते. याबाबत या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांकडून वैयक्तिक आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन होणार आहे. गुंतवणूक व अर्थव्यवस्थेसंदर्भात यात माहिती दिली जाणार आहे.
वित्त पत्रकार विवेक लॉ, आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील हे मार्गदर्शन करतील. तसेच चांगल्या संपत्तीच्या नियोजनाबाबत डॉ. प्रमोद त्रिपाठी यांचेही मोलाचे मार्गदर्शन गुंतवणूकदारांना मिळेल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. यामुळे याचा अधिकाधिक गुंतवणूकदारांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.