जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव आमंत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:13+5:302021-07-08T04:08:13+5:30
या पुरस्कारामध्ये जिल्हा गुणवंत खेळाडू व जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक या दोन गटात पुरस्कार देण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, ...
या पुरस्कारामध्ये जिल्हा गुणवंत खेळाडू व जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक या दोन गटात पुरस्कार देण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रुपये दहा हजार असे आहे. या पुरस्काराकरिता राज्यात १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत १० वर्षे कार्य केलेले पाहिजे, तसेच वयाची ३० वर्षे पूर्ण केलेली पाहिजे, खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व ५ वर्षांपैकी २ वर्षे जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे. या पुरस्काराचे वर्ष १ जुलै ते ३० जून या कालावधीमधील राहील. अधिक माहिती डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू महाराष्ट्रा जीओव्ही डॉट.इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या पुरस्कारासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मानकापूर संकुल येथे १५ जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल. २० जुलैपर्यंत सीलबंद लिफाफ्यात प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळवले आहे.