विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर पाच वर्षांत १८ हजार ५५३ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:42 AM2019-09-23T10:42:45+5:302019-09-23T10:43:55+5:30

विदर्भातील सिंचन प्रकल्पांना मागील पाच वर्षात २० हजार ९१.०१ कोटी रुपये निधी मिळाला. त्यापैकी १८ हजार ५५३.८०७ कोटी रुपये निधी विविध कामांसाठी खर्च करण्यात आला.

Irrigation projects in Vidarbha cost Rs 18 thousand crores | विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर पाच वर्षांत १८ हजार ५५३ कोटी खर्च

विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर पाच वर्षांत १८ हजार ५५३ कोटी खर्च

googlenewsNext
ठळक मुद्दे‘व्हीआयडीसी’ची माहिती एकूण २० हजार ९१ कोटी मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांना मागील पाच वर्षात २० हजार ९१.०१ कोटी रुपये निधी मिळाला. त्यापैकी १८ हजार ५५३.८०७ कोटी रुपये निधी विविध कामांसाठी खर्च करण्यात आला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही माहिती सादर केली.
१८ हजार ५५३.८०७ कोटी रुपयांपैकी ८ हजार ६५९.५७७ कोटी रुपये बांधकामावर, ७ हजार ९२५.९४८ कोटी रुपये भूसंपादनावर, ६८४.८०८ कोटी रुपये पुनर्वसनावर तर, १ हजार २८३.४७३ कोटी रुपये इतर कामांवर खर्च झाले आहेत. त्यातून १ लाख ६२ हजार २२७ हेक्टर जमिनीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. अमरावती विभागातील ६१ हजार ८६७ हेक्टर सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यात आला आहे. प्रकल्पांची पाणी साठवणूक क्षमता १२०७.४० एमसीएमने वाढली आहे तर, १५ हजार ४६४.७२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. १ एप्रिल २०१४ पूर्वी महामंडळाकडे १ हजार ९१४.४८७ कोटी रुपये शिल्लक होते.

Web Title: Irrigation projects in Vidarbha cost Rs 18 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.