भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 05:23 PM2023-04-02T17:23:00+5:302023-04-02T17:39:36+5:30

‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का’ या विषयावरील 'लोकमत' नॅशनल मीडिया कॉनक्लेव्हचे आयोजन

Is Indian media polarizing? Sudhir Mungantiwar reaction at lokmat national media conclave | भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

googlenewsNext

नागपूर : एखाद्या डिग्रीप्राप्त डॉक्टरने रुग्णावर उपचार करताना जर चुकीची औषधे दिली तर त्याचे वाईट परिणाम संपूर्ण शरीरावर होतात. तसच पत्रकारितेचं आहे. पत्रकाराने दिलेल्या एक चुकीच्या बातमीचा समाजावरदेखील विपरित परिणाम होतो. त्यामुळे पत्रकारिता व पत्रकार हे दोन्ही सामाजिक सखोलतेच भान ठेवून करणं अतिमहत्वाचं असल्याचे मत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आपण स्थित्यंतराकडून चाललो आहे, विकसनशील देशातून विकसीत देशाकडे जाण्याची वाटचालीत मीडियाची भूमिका ही सकारात्मक व राष्ट्राच्या हिताची असायला हवी, असं मुनगंटीवार म्हणाले.

‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का’ या विषयावरील 'लोकमत' नॅशनल मीडिया कॉनक्लेव्हचे नागपुरात आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील नामवंत पत्रकारांची मते ऐकण्याची संधी असून चर्चा सत्राद्वारे या विषयावर मंथन होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. केंद्रातील भाजप सरकार, सरकारी तपास यंत्रणाची परिस्थिती व सद्यस्थितीत  मीडियावर उठत असलेल्या प्रश्नांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. भारतीय मीडियाचं ध्रुवीकरण झाले का या विषयावर बोलताना त्यांनी  'नाही! या देशात मीडियाचं ध्रुवीकरण होऊ शकत नाही व होणारही नाही असे मत व्यक्त केले. ध्रुवीकरण म्हणजे आपल्या विचारांची बाब आहे. पत्रकारिता करताना दुषित दृष्टीचे परिणाम आपल्याला सत्याची बाजू मांडायला अडसर ठरते. पत्रकारिता करताना पत्राकाराची संबंधित विषयाबाबतची दृष्टी महत्वाची असून ती राष्ट्राच्या हिताची असावी मत त्यांनी व्यक्त केलं. 

'या' विषयांना तितकं महत्व का नाही?

मीडियात नेहमी राजकारणचं केंद्रस्थानी असतं, त्या चौकटीतून पाहिल्या मीडियाच्या ध्रुवीकरणावर प्रश्न उपस्थित होत होतो. पण त्यासोबत शिक्षा, स्वास्थ, पर्यावरण आदि विषयही तितकेच महत्वाचे आहेत. त्याबाबत आपली काही जबाबदारी नाही का, त्याकडे तितकेच लक्ष का दिले जात नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण लिहीत असलेल्या बातमीत भाव, आधार, तर्कवितर्क असायला हवे. आपण जे करतो ते राष्ट्राच्या हिताचं असायला हवं. आपल्याकडे बोलायला तोंड, पाहायला डोळे, ऐकायला कान आहेत पण दिसत असूनही तोंड बंद ठेवणं ही किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं ही चुकीची बाब आहेच परंतु, मीडिया बातमी देताना कशा व कोणत्या अँगलने देतो हे ही बघणं तितकचं महत्वाचं आहे असं म्हणत त्यांनी मीडियाचं ध्रुवीकरण होत आहे की नाही या प्रश्नावर प्रतिप्रश्न उपस्थित केला.

''मोदी काही पत्रकारांच्या मनात आहेत तर  काहींच्या डोक्यात''

आम्ही आमचे पोशाख बदलली असतील आधुनिक पेहराव घातले असतील पण आपल्या संस्कृतीचं भान आजही आमच्या मनात तसंच ठासून भरल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मीडिया ध्रुवीकरण म्हणजे काय? पत्रकारिता करताना सामाजिक सखोलतेचं भान ठेवत माहितीचं आदानप्रदान करणं महत्वाचं असतं. वर्तमान पत्रकारितेच्या बातम्या टाकताना पत्रकार कुठल्या अँगलने ती पाहतो व कशी प्रस्तुत करतो हे महत्वाचं असतं, पण त्यात ध्रुवीकरण कुठे आलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी पंतप्रधान मोदी हे काही पत्रकारांच्या मनात आहेत तर  काहींच्या डोक्यात, असे उदाहरण दिले. 

रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये या मीडिया कॉनक्लेव्हचे उद्घाटन करण्यात आले. लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. एएनआय अर्थात एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या संपादक (वृत्त) स्मिता प्रकाश, न्यूज १८ चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, पंजाब केसरी व नवोदया टाइम्सचे कार्यकारी संपादक अकु श्रीवास्तव, लोकमत मीडिया ग्रुपचे समूह संपादक विजय बाविस्कर, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे पहिले संपादक एस. एन. विनोद, हिंदुस्थान टाइम्सचे सहयोगी संपादक प्रदीप मैत्र, एबीपी माझाच्या उप-कार्यकारी संपादक सरिता कौशिक, न्यूज १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे.

Web Title: Is Indian media polarizing? Sudhir Mungantiwar reaction at lokmat national media conclave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.