परभणी आणि बीड प्रकरणात सरकारची भूमिका गुन्हेगारांना वाचविण्याची? महाविकास आघाडीचा आरोप
By मंगेश व्यवहारे | Updated: December 17, 2024 11:27 IST2024-12-17T11:21:30+5:302024-12-17T11:27:56+5:30
Nagpur : महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा

Is the government's role in the Parbhani and Beed cases to protect the criminals? Mahavikas Aghadi alleges
मंगेश व्यवहारे
नागपूर : परभणी आणि बीड प्रकरणात सरकारची भूमिका गुन्हेगारांना वाचविण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात निषेध मोर्चा काढण्यात आला.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी आमदारांनी घोषणाबाजी करीत सरकारवर ताशेरे ओढले. सत्ता महायुतीची पाठराखण हत्येतील आरोपींची, हत्येतील आरोपीचे साथीदार अस्ववेदनशील महायुती सरकार अशा आशयाचे फलक झळकवीत विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आक्रमक होत प्रचंड घोषणाबाजी केली. आंदोलनात भाई जगताप सचिन अहिर नाना पटोले विकास ठाकरे जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर राहुल पाटील सचिन भोईर आदींचा समावेश होता
"परभणी प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सूर्यवंशी च्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की त्याचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाला. तर बीड मधील सरपंचाच्या खून प्रकरणात सरकार आरोपीला पाठीशी घालत आहे. या दोन्ही प्रकरणात सत्ताधारी आणि त्यांचे हस्तक सहभागी असल्याने महाविकास आघाडीने आंदोलनाची भूमिका घेतली असून हा विषय आम्ही सभागृहातही उचलून धरणार आहोत."
- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद