अत्यसंस्कारासाठी दावते इस्लामीचे विशेष वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:52+5:302021-05-31T04:07:52+5:30
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दावते इस्लामीजवळ वेगळी रुग्णवाहिका व इतर वाहन उपलब्ध आहे. जुलै २०२० पासून आतापर्यंत ...
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दावते इस्लामीजवळ वेगळी रुग्णवाहिका व इतर वाहन उपलब्ध आहे. जुलै २०२० पासून आतापर्यंत विविध कारणांनी मृत्यू झालेल्या मृतदेहांवर दावते इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले आहेत. ८ मार्च १९९० पासून सेवा देत असलेल्या दावते इस्लामीने तुरुंगातील कैद्यांचे प्रबोधन, व्यसनी व्यक्तींना मार्गदर्शन करण्याचे कामही केले आहे. याशिवाय कोरोनाच्या काळात गरिबांना धान्याचा पुरवठा केला आहे. जकात (मदत) घेण्याचा हक्क असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला आपल्या घराच्या बाहेर निघू शकत नव्हत्या, अशा व्यक्तींना जकातदात्यांकडुन जकात घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचविली. भोजनाचे पार्सल गरजूंना वितरित केले. दावते इस्लामीचे मो. फिरोज खान, फारुख आलम, अब्दुल हलीम व मौलाना नईमुद्दीन यांनी सांगितले की, मागील वर्षी दुसऱ्या शहरातून नागपुरात उपचारासाठी आलेल्या काही नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी संस्थेने पार पाडली. या संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी अल्लाहने आमची निवड केल्यामुळे त्यांनी अल्लाहचे आभार मानले. संस्थेशी निगडित सर्व कार्यकर्त्यांमुळे ही सर्व कामे पार पाडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
...........