नागपूर मनपातील आर्थिक तंगीवरून वनवे भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:28 PM2018-08-18T23:28:02+5:302018-08-18T23:30:57+5:30

स्थायी समितीचा २०१८-१९ चा प्रस्तावित अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर कामांच्या फाईल तयार झाल्या. मात्र त्यानंतर प्रशासनातर्फे संबंधित कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर लगेच निधी उपलब्ध नसल्याचे मनपाच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नाही. आयुक्तांनी शहरातील विकास कामांवर ‘ब्रेक’ लावला आहे. आर्थिक स्थिती दयनीय असल्याचे कारण सांगितले जात आहे. अशीच परिस्थिती असेल तर महापालिका बर्खास्त करण्याचा प्रस्ताव मनपा सभागृहात आणा, असे खडे बोल विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महापौर नंदा जिचकार यांना सुनावले.

On issue of Nagpur municipal corporation financial crises, Wanve outbreak | नागपूर मनपातील आर्थिक तंगीवरून वनवे भडकले

नागपूर मनपातील आर्थिक तंगीवरून वनवे भडकले

Next
ठळक मुद्देसत्तापक्षाला घेरले : तर मनपा बर्खास्त करून टाका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थायी समितीचा २०१८-१९ चा प्रस्तावित अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर कामांच्या फाईल तयार झाल्या. मात्र त्यानंतर प्रशासनातर्फे संबंधित कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर लगेच निधी उपलब्ध नसल्याचे मनपाच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नाही. आयुक्तांनी शहरातील विकास कामांवर ‘ब्रेक’ लावला आहे. आर्थिक स्थिती दयनीय असल्याचे कारण सांगितले जात आहे. अशीच परिस्थिती असेल तर महापालिका बर्खास्त करण्याचा प्रस्ताव मनपा सभागृहात आणा, असे खडे बोल विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महापौर नंदा जिचकार यांना सुनावले.
कामांच्या फाईल स्थायी समितीकडून ‘क्लिअर’ झाल्यावरही प्रशासनाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात आहे. या मुद्यावर शनिवारी काँग्रेस नगरसेवकांचे शिष्टमंडळ महपौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आणि सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांना भेटले.
चर्चेदरम्यान महापौरांनी विरोधी पक्ष नेत्यांना सांगितले की, मनपाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे फाईल मंजूर होत नाही आहेत. यवर विरोधी पक्षनेते वनवे संतापले. ते म्हणाले, जर आर्थिक परिस्थिती वाईट आहे, लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देता येत नसेल तर मनपाला तात्काळ बरखास्त करायला हवे. मनपा आयुक्त सदस्यांसह नागरिकांच्या अधिकारांचेही हनन करीत आहेत. अशा परिस्थितीत सत्तापक्षाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले. यावर महापौर जिचकार यांनी आयुक्त सुटीवर असल्याने एका आठवड्याची मुदत द्यावी, अशी विनंती करीत लवकरच ही समस्या सोडविली जाईल, असे स्पष्ट केले.
वनवे म्हणाले जे पत्र नगरसेवकांना जारी करण्यात आले आहेत त्यांना मंजुरी प्रदान करण्यात यावी, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल. या चर्चेत नगरसेवक किशोर जिचकार, प्रफुल्ल गुड़धे, जुल्फेकार अहमद भुट्टो, कमलेश चौधरी, पुरुषोत्तम हजारे, दिनेश यादव, परसराम मानवटकर, सैयदा बेगम अन्सारी, हर्षला मनोज साबळे, अरुण डवरे, चंदू वाकोडकर आदी उपस्थित होते.

Web Title: On issue of Nagpur municipal corporation financial crises, Wanve outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.