कर न भरणाऱ्यांना वॉरंट बजावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 07:49 PM2018-08-20T19:49:49+5:302018-08-20T19:54:22+5:30

मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. वसुली होण्यासाठी मालमत्ताधारकांना डिमांड वेळेवर पोहोचल्या पाहिजे. त्यांना वेळोवेळी स्मरण करून देण्याची जबाबदारी कर संकलन करणाऱ्यांची आहे. त्यानंतरही निर्धारित कालावधीत कर न भरणाऱ्यांना वॉरंट बजावून कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी सोमवारी कर निरीक्षक व कर संकलक यांना दिले.

Issue warrant for non taxpayers | कर न भरणाऱ्यांना वॉरंट बजावा 

कर न भरणाऱ्यांना वॉरंट बजावा 

Next
ठळक मुद्देसभापती जाधव यांचे निर्देश : नागपूर धंतोली झोनमध्ये कर आकारणी व कर संकलन समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. वसुली होण्यासाठी मालमत्ताधारकांना डिमांड वेळेवर पोहोचल्या पाहिजे. त्यांना वेळोवेळी स्मरण करून देण्याची जबाबदारी कर संकलन करणाऱ्यांची आहे. त्यानंतरही निर्धारित कालावधीत कर न भरणाऱ्यांना वॉरंट बजावून कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी सोमवारी कर निरीक्षक व कर संकलक यांना दिले.
धंतोली झोनमध्ये आकारणी व कर संकलन विशेष समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपसभापती सुनील अग्रवाल, विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्यासह झोनमधील सर्व वॉर्डाचे कर निरीक्षक व कर संकलक उपस्थित होते.
कर वसुली वेळेवर होत नसल्याने महापालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असूनही झोनमधील कर संकलनाच्या कामात दिरंगाई होत आहे. ही स्थिती सुधारण्याची गरज आहे. झोनमधील प्रत्येक वॉर्डातून कर संकलन करताना नागरिकांशी योग्य समन्वय साधण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. प्रत्येक नागरिकाच्या मनात महापालिकेची विश्वासार्हता कायम राहील, याची खबरदारी घेऊ न कर संकलनाची प्रक्रिया पार पाडण्याची सूचना जाधव यांनी केली.
कर वसुलीत वाढ होण्यासाठी नागरिकांशी संवाद साधा. यासाठी कर निरीक्षक व कर संकलक यांनी नागरिकांपर्यंत जावे. त्यांच्या अडचणी जाणून घ्या, कर आकारणी प्रक्रियेची योग्य माहिती देण्याची सूचना जाधव यांनी केली. कर संकलन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिका तत्पर असून, झोनमधील कर निरीक्षक व कर संकलकांनी स्थानिक नगरसेवकांचेही सहकार्य घ्यावे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता येईल, असा विश्वास सुनील अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Issue warrant for non taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.