मास्कसाेबत घरात हवा चांगली खेळती ठेवणेही महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 09:50 AM2021-04-28T09:50:24+5:302021-04-28T09:50:44+5:30

Coronavirus in Nagpur मास्क आवश्यक आहेच पण घरात हवा चांगली खेळती राहावी (व्हेंटिलेशन) हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

It is also important to keep the air in the house well with the mask | मास्कसाेबत घरात हवा चांगली खेळती ठेवणेही महत्त्वाचे

मास्कसाेबत घरात हवा चांगली खेळती ठेवणेही महत्त्वाचे

Next
ठळक मुद्दे उच्च गुणवत्तेचे मास्कच विषाणूला दूर ठेवतील

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : अनेक प्रयत्न करूनही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सामाजिक प्रसार थांबवायचा कसा, हा प्रश्न सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेलाही पडला आहे. सरकारने नुकतेच घरामध्ये वावरतानाही मास्कचा वापर करावा, अशा सूचना केल्या आहेत. याबाबत लाेकमतने तज्ज्ञ डाॅक्टरांशी संवाद साधला. मास्क आवश्यक आहेच पण घरात हवा चांगली खेळती राहावी (व्हेंटिलेशन) हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. नितीन देवस्थळे यांच्या मते सामाजिक प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील एखादा सदस्य बाहेर जाणारा असेल आणि त्याच्यात लक्षणे आढळत नसली तरी घरातील इतरांना संक्रमित करण्यास कारणीभूत ठरू शकताे. त्यामुळे ही आजारापूर्वीचा उपाय आहे. दुसऱ्या लाटेतील ९० टक्के रुग्ण असिम्टमॅटिक असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील विषाणूचा स्ट्रेन वेगळा आहे. मात्र मृत्युदर १.५ टक्के असला तरी हा हवेतूनही पसरू शकताे आणि प्रसार वेगाने हाेताे. यामुळे संक्रमित हाेण्याची शक्यता अधिक आहे. मुले हे सुपर स्प्रेडर आहेत आणि त्यांच्यात संक्रमित हाेण्याची क्षमता अधिक आहे. ते पालक व ज्येष्ठांच्या संपर्कात सहज येतात व त्यातून ज्येष्ठांना संक्रमणाचा धाेका अधिक असल्याचे मत डाॅ. देवस्थळे यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते एन-९५ मास्क हा पूर्ण सुरक्षित आहे पण याेग्य मास्क ओळखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एका मास्कवर विसंबून न राहता दाेन मास्क वापरणे अधिक याेग्य आहे.

संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डाॅ. नितीन शिंदे यांच्या मते घरामध्ये नियमित मास्क वापरणे व्यवहार्य ठरणारे नाही. मात्र द्वितीय स्तराचा संसर्ग राेखणे महत्त्वाचे आहे. एक सदस्य पाॅझिटिव्ह असेल तर घरातील इतर चार सदस्यांनीही मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र कुटुंबात संसर्ग राेखण्यासाठी घरातील हवा खेळती ठेवणे, हा सर्वाेत्तम पर्याय आहे. डाॅ. शिंदे यांनी हवेची गुणवत्ता राखण्यावर भर दिला आहे. आपण टाईल्स आणि वस्तूंची साफसफाई करताना हवेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करताे. अनेकदा सॅनिटायझेशनही आवश्यक नाही तर केवळ हवेची गुणवत्ता राखणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. स्वत: फिट राहिले तर विषाणूला दूर ठेवता येते. तुम्ही काेणता मास्क वापरता हे मॅटर करीत नाही. तुम्ही एन-९५ मास्क घेतला पण ताे गुणवत्तापूर्ण नसेल तर सुरक्षित राहण्याचा तुमचा उद्देश सफल हाेणार नाही. पूर्णपणे पॅक असलेला मास्क घेणे आणि बाहेर जाताना त्याचा नेहमी वापर करणे आवश्यक आहे. बाहेर तासाभरासाठी जरी मास्क काढला तरी तुमची सुरक्षिता धाेक्यात आली म्हणून समजा.

- आकडेवारीनुसार बाेलणाऱ्या दाेन्ही व्यक्तींनी मास्क घातला तर संसर्ग हाेण्याचे प्रमाण १.५ टक्के म्हणजे अत्यल्प असते. संक्रमित व्यक्तीने घातला व सुदृढ व्यक्तीने वापरला नाही तर संसर्गाची शक्यता ५ टक्के असते. सुदृढ व्यक्तीने वापरला आणि संक्रमित रुग्णाने वापरला नसेल तर संसर्गाचा धाेका ३० टक्के असताे. मात्र संक्रमित व सुदृढ अशा दाेघांनीही मास्क वापरला नाही तर धाेका ९० टक्क्यांनी वाढताे.

- यूएस सेंटर फाॅर डिसीज कन्ट्राेल ॲण्ड प्राेटेक्शन (सीडीसी) कडूनही अशाच प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. सीडीसीच्या मते जरी तुम्ही ६ फुटांचे अंतर राखून असले तरी मास्क वापरणे अनिवार्य आहे. विशेषत: जर घरी तुमच्या आसपास घराबाहेरील व्यक्ती असेल तर मास्क वापरणे नितांत गरजेचे आहे.

Web Title: It is also important to keep the air in the house well with the mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.