सेवा अन संस्काराचेच हे अखंड व्रत

By admin | Published: June 25, 2014 01:23 AM2014-06-25T01:23:19+5:302014-06-25T01:23:19+5:30

प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळेचा चौथा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त श्याम वर्धने, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, आ. विकास कुंभारे,

It is a continuous vow of service and honor | सेवा अन संस्काराचेच हे अखंड व्रत

सेवा अन संस्काराचेच हे अखंड व्रत

Next

प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळेचा चौथा वर्धापनदिन
नागपूर : प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळेचा चौथा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त श्याम वर्धने, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, आ. विकास कुंभारे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, माजी स्थायी समिती अध्यक्ष दीपक पटेल, अतुल लोंढे, हरीश हरकरे, पुरुषोत्तम वाडेवाले उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ पं. कृष्णकुमार शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हवन करून करण्यात आला. यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आहुती टाकण्यात आली. त्यानंतर भारतमाता पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश हरकरे यांनी केले. हरकरे यांनी गेल्या चार वर्षात शाळेचा विकास समजावून सांगितला.
मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी शाळेला शासकीय स्तरातून काही मदत लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हवन करीत असताना पंडितच मंत्रोपचार करीत असल्याचा भास आपल्याला झाला, असे ते म्हणाले. या शाळेत मुलांवर अतिशय चांगले संस्कार होत आहेत. घरात राहणाऱ्या मुलांना साधा भोजनमंत्र येत नाही पण या मुलांनी संस्कृतचे मंत्र म्हणून दाखविले, याबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. विकास कुंभारे म्हणाले, ही शाळा म्हणजे नागपूरचे भूषण आहे. मी विधिमंडळातही या शाळेबद्दल सर्वांनाच सांगत असतो. दयाशंकर तिवारी यांनी सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अतुल लोंढे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे सचिव श्रीकांत आगलावे यांनी केले. आभार चौलीवाल यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. राजेश मुरकुटे, राजेश छाबरिया, गुन्हेशाखा पोलीस निरीक्षक रमेश तायडे, विनोद बोरीकर, अनिता सेराम, दाभेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: It is a continuous vow of service and honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.