गड्डीगोदाम आरयूबीखालून बस-ट्रक जाणे कठीणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:08 AM2021-06-02T04:08:08+5:302021-06-02T04:08:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामठी मार्गावरील गुरुद्वाराजवळील गड्डीगोदाम आरयूबीतून बस, ट्रक यासारखी मोठी वाहने जाणे काही काळ तरी ...

It is difficult to go by bus-truck under Gaddigodam RUB | गड्डीगोदाम आरयूबीखालून बस-ट्रक जाणे कठीणच

गड्डीगोदाम आरयूबीखालून बस-ट्रक जाणे कठीणच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कामठी मार्गावरील गुरुद्वाराजवळील गड्डीगोदाम आरयूबीतून बस, ट्रक यासारखी मोठी वाहने जाणे काही काळ तरी शक्य होणार नाही. आरयूबी वाहतुकीला खुला करण्यात आला असला तरी डबलडेकर पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. जोपर्यंत तो पूल बनत नाही तोपर्यंत मोठी वाहने जाणे शक्य होणार नाही. अगोदरच डबलडेकर पुलाच्या कामाला उशीर झाला आहे.

कोरोना काळात गड्डीगोदाम आरयूबीच्या कामाला उशीर झाला. ऑक्टोबर २०२० मध्ये एका ट्रेलरने आरयूबीला धडक मारली. अनेक मुद्दे विचारात घेऊन जुन्या गर्डरची उंची कमी करत काँक्रीट गर्डर तयार करण्यात आले. आता उंची कमी असल्याने तेथून मोठी वाहने जाण्यास अडचण येणार आहे. गड्डीगोदामजवळ निर्माण होत असलेल्या डबलडेकर पुलाचे अनेक काळापासून केवळ पिलरच उभे दिसून येत आहेत.

Web Title: It is difficult to go by bus-truck under Gaddigodam RUB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.