हा भारतीय भाषांमधून शिक्षण संपविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:21 AM2018-06-27T00:21:04+5:302018-06-27T00:22:01+5:30
सध्या शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. यातूनच महाराष्ट्रासह देशभरात परकीय भाषेच्या हव्यासापोटी भारतीय भाषांमधून शिक्षण संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महानगरपालिकेद्वारे ३४ मराठी शाळांना बंद पाडणे हा याच षङ्यंत्राचा भाग असल्याची टीका मराठी शाळा बचाओ कृती समितीतर्फे करण्यात आली. समितीच्यावतीने महापालिकेच्या निर्णयाचा निषेध करीत याविरोधात मंगळवारी कॉटन मार्के ट येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. यातूनच महाराष्ट्रासह देशभरात परकीय भाषेच्या हव्यासापोटी भारतीय भाषांमधून शिक्षण संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महानगरपालिकेद्वारे ३४ मराठी शाळांना बंद पाडणे हा याच षङ्यंत्राचा भाग असल्याची टीका मराठी शाळा बचाओ कृती समितीतर्फे करण्यात आली. समितीच्यावतीने महापालिकेच्या निर्णयाचा निषेध करीत याविरोधात मंगळवारी कॉटन मार्के ट येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.
आंदोलनात आमदार नागो गाणार, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे, जम्मू आनंद, रवींद्र फडणवीस, देवराव मांडवकर, अ.भा. दुर्बल समाज विकास संसाधनचे लीलाधर कोहळे, धीरज भिसीकर, यशवंत तेलंग, माया चौरे तसेच कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिकेने ३४ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अ.भा. दुर्बल समाज विकास संघटनेच्यावतीने न्यायालयात डिसेंबर २०१७ मध्ये निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे ही बाब उजेडात आली. विद्यार्थ्यांची पुरेशी पटसंख्या नसल्याने या शाळा बंद करीत असल्याचे हमीपत्र महापालिकेने न्यायालयात सादर केले होते. मराठी शाळांविषयी असे धोरण राबविताना इंग्रजी माध्यमांच्या शाळांबाबत अशाप्रकारे निर्णय का घेतला जात नाही, असा सवाल नागो गाणार यांनी उपस्थित केला. मनपाच्या शाळांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून विद्यार्थी व पालकांना शाळेत मुलांना घालण्यासाठी प्रेरित करण्याऐवजी शाळा बंद करून पळवाट शोधली जात असल्याची टीका त्यांनी केली. हे धोरण योग्य नाही. राज्य शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महापालिकेविरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. यावेळी कॉटन मार्के ट परिसरात येणाऱ्या-जाणाºयांना मराठी शाळा वाचविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटण्यात आली.