कोरोनाची तिसरी लाट रोखणे सर्वांचीच जबाबदारी - अरविंद हिंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:00+5:302021-06-09T04:11:00+5:30
कामठी : ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय ही वास्तविकता आहे. मात्र गतवेळीप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्यास तिसरी ...
कामठी : ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय ही वास्तविकता आहे. मात्र गतवेळीप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्यास तिसरी लाट येण्यास विलंबही लागणार नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी प्रत्येकाने नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे मत कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी व्यक्त केले.
कामठी तालुक्यातील अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हिंगे यांनी सोमवारी शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. कामठी पोलीस स्टेशनच्या सभागृहात आयोजित या बैठकीला हॉटेल चालक, बार चालक, हॉल व लॉन व्यावसायिक उपस्थित होते. या बैठकीत उपस्थिताना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, दुय्यम पोलीस निरीक्षक काळे, जुनी कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे आदी उपस्थित होते.
===Photopath===
070621\img-20210607-wa0133.jpg
===Caption===
बैठकीत तहसीलदार अरविंद हिंगे मार्गदर्शन करताना