पहिले लग्न असताना दुसरे लग्न करणे अवैध; दुसरीला खावटी देण्यास काेर्टाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 08:30 IST2021-10-20T08:30:24+5:302021-10-20T08:30:37+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी एका प्रकरणात दिला निकाल

पहिले लग्न असताना दुसरे लग्न करणे अवैध; दुसरीला खावटी देण्यास काेर्टाचा नकार
नागपूर : पहिले लग्न कायम असलेल्या व्यक्तीसोबत दुसरे लग्न करणे अवैध आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी एका प्रकरणात दिला.
या प्रकरणातील पती राजू ६६ वर्षांचा असून, दुसरी पत्नी राणी ४४ वर्षांची (दोन्ही नावे काल्पनिक) आहेत. राजूचे पहिले लग्न १९९० मध्ये झाले होते. दरम्यान, मतभेदामुळे राजू व त्याची पहिली पत्नी विभक्त झाले. राणीच्या दाव्यानुसार, ती राजूच्या संपर्कात आल्यानंतर दोघांनी १६ ऑगस्ट २००३ रोजी लग्न केले आणि ते पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहायला लागले. राजूने पहिले लग्न लपवून ठेवले होते. त्याविषयी माहिती मिळाल्यानंतर राणीने पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे राजूने २००९ मध्ये पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता.