चुकीच्या परंपरांना चिकटून राहणे योग्य नव्हे; आध्यात्मिक गुरू कमलेश पटेल (दाजी) यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 08:47 AM2022-06-01T08:47:18+5:302022-06-01T08:47:38+5:30

दी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट - श्री रामचंद्र मिशन, सहज मार्गचे आध्यात्मिक गुरू डॉ. कमलेश पटेल (दाजी) यांनी ही भावना व्यक्त केली.

It is not right to cling to wrong traditions - Opinion of spiritual guru Kamlesh Patel | चुकीच्या परंपरांना चिकटून राहणे योग्य नव्हे; आध्यात्मिक गुरू कमलेश पटेल (दाजी) यांचे मत

चुकीच्या परंपरांना चिकटून राहणे योग्य नव्हे; आध्यात्मिक गुरू कमलेश पटेल (दाजी) यांचे मत

googlenewsNext

-कमल शर्मा 

नागपूर : चुकीच्या परंपरांना चिकटून राहणे योग्य नव्हे. वेळेचे महत्त्व समजावे. वेळ प्रवाहासारखा असतो. परिवर्तन मान्य केले नाही तर त्या प्रवाहात आयुष्याची नाव बूडून जाईल. म्हणून, चांगल्या परंपरांचे अनुसरण करताना वाईटांचा त्याग करणे गरजेचे आहे.दी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट - श्री रामचंद्र मिशन, सहज मार्गचे आध्यात्मिक गुरू डॉ. कमलेश पटेल (दाजी) यांनी ही भावना व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा शिबिराच्या समारोपीय सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरला आले असता त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. या चर्चेदरम्यान त्यांनी धर्म, अध्यात्म आणि जीवन पद्धती या सारख्या विषयांवर परखड मत व्यक्त केले. दाजी स्थापित मान्यतांपेक्षा अनुभवांना सार्थक मानतात. त्यांनी यावेळी, ध्यानप्रथा, यौगिक प्राणाहुतीवरही प्रकाश टाकला. ते अध्यात्माला वैज्ञानिकदृष्या बघण्याचा सल्ला देतात.

एका क्षणाचा अनुभव धोकादायक
- दाजी यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर प्रकाश टाकला. ज्ञान आणि विज्ञान गरजेचे आहे. परंतु, अनुभव जास्त महत्त्वाचा ठरतो. केवळ एका क्षणाचा अनुभव धोकादायक ठरू शकतो. कारण, आपण एका वेळेच्या अनुभवानेच हर्षोल्लासिक होतो. परंतु, अनुभवात सातत्य असणे गरजेचे आहे. ज्ञानापेक्षा अनुभव आणि क्षणिक अनुभवापेक्षा स्थायी अनुभव सर्वोच्च आहे. दिव्यत्त्वाचा अनुभव करणे वेगळी गोष्टी आणि दिव्यत्त्व प्राप्त करणे वेगळी गोष्ट आहे.

वृत्ती तशी प्रवृत्ती आणि तसेच प्रारब्ध
- आपल्याला वैचारिक परिवर्तनाची गरज आहे. आपण पूर्वी खेळणे मागत होतो आणि नंतर मनोरंजन आणि आता कशा-कशाची मागणी करतो. आपण अंधकारात आहोत. काही लोकांनी ही जाणीव आहे. परंतु, शरीर साथ देत नाही. खरे सांगायचे तर सहजयोग अनुभूतीचे प्रशिक्षण कमी वयापासूनच सुरू व्हायला हवे. जशी वृत्ती असे तशीच प्रवृत्ती होईल आणि प्रारब्धही तसेचा असेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

हृदय मोकळे असेल तर मार्गही सापडतोच
- अध्यात्म आणि धर्मावर सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना, प्रत्येक व्यक्तीला चांगले आणि वाईट याची जाण असल्याचे दाजी म्हणाले. जर हृदय मोकळे असेल आणि हृदयाची ऐकण्याची तयारी असेल तर मार्गही मिळेलच. हृदयातून सत्य प्रतिपादित होते. प्राणी, पक्षी, वृक्षांनाही चांगल्या-वाईटाची माहिती असतेच. परंतु, माणूस जाणूनबूजून वाईट कृत्य करण्यास धजावतो. संत बनू तर संसारिक मोहजाळ सोडावे लागेल, ही माणसाची चुकीची धारणा आहे. ही वास्तविकता नाही. ध्यान तर शांतीचा मार्ग आहे.

धर्म - नरकाची भीती आणि स्वर्गप्राप्तीचे आमिष
- वर्तमानात नरकाच्या भीतीने आणि स्वर्गाच्या आमिषापोटी लोक धर्माशी जुळले आहेत. ईश्वर सर्वत्र असल्याचे लोक मानतात. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आपण सगळ्यांचेच पूजन करतो. नदी-डोंगर-आकाशाचे पूजन करतोच, आपल्याला परंपरांमध्येच संतोष प्राप्त होतो. धर्माच्या भावनेच आदर असलाच पाहिजे. आपण दिव्य, शांतीपूर्ण होण्याचे प्रयत्न करतो. परंतु, एक वेळ अशी येते की, त्या सगळ्यांचा कंटाळा येतो. योगीजन त्या जागेवर पोहोचतात तेव्हा कमळाप्रमाणे उमलून जातात.

भारतीयत्त्वातून वैश्विक बंधुत्त्व आणि शांतीचा संदेश
- भारत माता, हा शब्द कोणत्या भौगोलिक रचनेतून आलेला शब्द नाही. ही संस्कृती आहे. भारतीयत्त्व सत्य, प्रमे, शांती, विश्वबंधुत्त्वाचा संदेश देतो. शांती आणि सद्भावना, हीच भारताची संस्कृती आहे. भारताव्यक्तिरिक्त जिथे कुठे भारतीय आहेत, तिथे ते शांतीचे दीपक प्रज्वलित करत आहेत. भारतीयत्त्व जीवन जगण्याची कला असल्याचे दाजी म्हणाले.

अंत:करणाची शुद्धी महत्त्वाची
- प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आपण अनेक गोष्टींनी प्रभावित होत असतो. कुठे काही पाहिले तर त्याचा लगेच प्रभाव पडतो. कधी ही बाब चांगली असते तर कधी वाईट. वाईट प्रवृत्तीपासून बचाव करण्यासाठी अंत:करणाची शुद्धी गरजेची आहे. सहज मार्ग त्याचीच एक प्रक्रिया आहे. अंत:करण शुद्धीसाठी सहज मार्ग जोर देतो. वैचारिक आणि आध्यात्मिक शांती प्राप्त होते.

मन एकाग्र तरच समाधान
सर्वांनीच सुखाची अपेक्षा धरून ठेवली आहे. परंतु, विचलित हृदयाने सुखाची प्राप्ती होत नाही. मन एकाग्र असेल तरच समाधान मिळेल. ध्यानयोगाने एकाग्रता साधता येते. सहज योगाच्या माध्यमातून राजयोग व यौगिक प्राणाहुतीची प्रगती होते. आनंद हा शांततेशी जुळला असल्याचे प्रभू श्रीकृष्णानेही सांगितले आहे. ध्यान योगाचा आधार एकाग्रतेशी निगडीत आहे. ऊर्जेचे रुपांतरण वजन कमी करूनच होते. यौगिक प्राणाहुतीने हे शक्य आहे. यालाच सहज योग म्हणतात. यात गुरू केवळ माध्यम असतो. समाधान अस्थायी नव्हे तर स्थायी असावे. आपल्याला वजनाची सवय झाली आहे. हे वजन दूर केल्यानेच स्थायी समाधान प्राप्त होईल.

काही विशेष गोष्टी

दाजी यांनी ध्यान व यौगिक प्राणाहुतीचा मनोविज्ञान व आनुवांशिक परिणामांवर संशोधन करण्यासाठी वैज्ञानिकांचे एक मोठे पथक तयार केले आहे.दाजींच्या मतानुसार, प्रत्येक व्यक्ती स्वत: प्रयोगकर्ता असून परीक्षणाचे माध्यमही तोच आहे आणि त्याचे परिणामही तोच आहे. जगातील प्रत्येक कुटुंबासाठी हार्टफुलनेस ध्यान पद्धती उपलब्ध करणे, हे दाजींचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या मार्गदर्शनात १३० देशांमध्ये ध्यान कार्यक्रम सुरू आहेत.

Web Title: It is not right to cling to wrong traditions - Opinion of spiritual guru Kamlesh Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर