‘जबरदस्ती एकता आणणे गैर’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:40 AM2024-09-26T11:40:28+5:302024-09-26T11:45:14+5:30
विविधतेत जगताना आपण एक आहोत हे समजून घेतले पाहिजे - डॉ. मोहन भागवत
नागपूर : वास्तवात पाहिले, तर संपूर्ण जग हे एकच आहे. मात्र, त्यात विविधतेची आवश्यकता आहे. अशा स्थितीत विविधता मिटवून जबरदस्तीने एकात्मता आणण्याचा प्रयत्न करणे हा पुढे जाण्याचा मार्ग नाही. विविधतेत जगताना आपण एक आहोत हे समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
ज्येष्ठ हिंदी कवी, लेखक दयाशंकर तिवारी (मौन) यांच्या ‘मां भारती के सारथी पं. दीनदयाल उपाध्याय’ या महानाट्याच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. हिंदी मोरभवन येथे झालेल्या कार्यक्रमाला दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा उपस्थित होते.