कंट्रोल रूमने पाठविलेल्या रुग्णांना दाखल करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 10:12 PM2021-05-06T22:12:26+5:302021-05-06T22:14:53+5:30

Corona patient control room मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नागपूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे सेन्ट्रल कंट्रोल रुम मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या माळ्यावर सुरू करण्यात आली आहे. कंट्रोल रूमच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करण्यात येत आहे. कंट्रोल रूममधून पाठविण्यात आलेल्या रुग्णांना दाखल करून घेणे हॉस्पिटलला बंधनकारक आहे.

It is mandatory to admit the patients sent by the control room | कंट्रोल रूमने पाठविलेल्या रुग्णांना दाखल करणे बंधनकारक

कंट्रोल रूमने पाठविलेल्या रुग्णांना दाखल करणे बंधनकारक

Next
ठळक मुद्देसर्व रुग्णालयांत कंट्रोल रूमच्या माध्यमातूनच कोविड रुग्णांना बेड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नागपूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे सेन्ट्रल कंट्रोल रुम मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या माळ्यावर सुरू करण्यात आली आहे. कंट्रोल रूमच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करण्यात येत आहे. कंट्रोल रूममधून पाठविण्यात आलेल्या रुग्णांना दाखल करून घेणे हॉस्पिटलला बंधनकारक आहे. कोणत्याही शासकीय तसेच खासगी रुग्णालयात ८० टक्के क्षमतेत अतितातडीचे रुग्ण वगळून थेट रुग्णाला दाखल करता येणार नाही. कंट्रोल रूममधून बेड अलॉट झाल्यानंतरच संबंधित रुग्णाला दाखल करता येईल, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

कंट्रोल रूम २४ तास सुरू आहे. येथे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तीन शिफ्टमध्ये तज्ज्ञांची चमू उपलब्ध असेल. हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड नसले तरीही रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरू करता येईल. कंट्रोल रूममधून उपलब्धतेनुसार तातडीने बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील व जेथे बेड उपलब्ध झाला तेथे रुग्णाला ट्रान्सफर केले जाईल. कंट्रोल रुममधून बेडच्या उपलब्धेसंदर्भात सातत्याने माहिती घेतली जाईल. रुग्णांची माहिती दिल्यानंतर रुग्णाचा एसपीओ- २ लेवल, एचआरसीटी, आरटीपीसीआर रिपोर्ट या व्हॉटसअ‍ॅपवर पाठविता येईल. यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने तातडीने रुग्णालयात उपलब्धतेनुसार बेड उपलब्ध केला जाईल. संबंधित हॉस्पिटललादेखील याची पूर्वसूचना दिली जाईल.

दरम्यान, आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी कंट्रोल रुमची पाहणी केली. येथील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, उपायुक्त महेश धामेचा, महेश मोरोणे व सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

अतिगंभीर रुग्णाची माहिती देणे बंधनकारक

अतिगंभीर स्वरूपातील कोविड रुग्ण दाखल केल्यास एक तासाच्या आत कंट्रोल रुमला याबाबत माहिती देणे संबंधित रुग्णालयास बंधनकारक राहील. तथापि, या सवलतीचा दुरुपयोग केल्याचे लक्षात आल्यास संबंधित हॉस्पिटल आणि संबंधित डॉक्टरवर कारवाईस पात्र राहील, असाही इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

असे आहेत संपर्क क्रमांक

टेलिफोन क्रमांक ०७१२ - २५६७०२१ (१० लाइन उपलब्ध करण्यात आले आहे.)

व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून रुग्णांची विविध माहिती ७७७००११५३७, ७७७००११४७२ या नंबरवर पाठवता येईल.

Web Title: It is mandatory to admit the patients sent by the control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.