जीवघेणे ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Published: January 30, 2015 12:52 AM2015-01-30T00:52:08+5:302015-01-30T00:52:08+5:30

कामठी-कळमना रोडवरील (येरखेडा रोड) रेल्वे क्रॉसिंगचे फाटक एकवेळा बंद झाल्यावर २० मिनिटानंतरच उघडते. त्यानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ जातो.

It is meant to be a fatal railway crossing | जीवघेणे ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग

जीवघेणे ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग

Next

कळमना-कामठी रोड स्थित क्रॉसिंग : संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
विहंग सालगट - नागपूर
कामठी-कळमना रोडवरील (येरखेडा रोड) रेल्वे क्रॉसिंगचे फाटक एकवेळा बंद झाल्यावर २० मिनिटानंतरच उघडते. त्यानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ जातो. या क्रॉसिंगमुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. काही तर परीक्षेपासून वंचित राहिले. काहींचे करिअर तर जीवावरही बेतले. विशेष म्हणजे, या क्रॉसिंगवरील वाहतुकीची कोंडी दूर करणे शक्य आहे, परंतु रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या क्रॉसिंगचे वैशिष्ट्य म्हणजे, येथून एनटीपीसीच्या (कोराडी) प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविण्यासाठी रेल्वे मालगाड्यांची वाहतूक होते. पूर्वी येथून मोजक्याच रेल्वे गाड्या धावत होत्या, परंतु कोराडी येथे नवीन प्रकल्प सुरू झाल्याने आणि कोळशाच्या मागणीत वाढ झाल्याने मालगाड्यांची संख्या पाचवरून वीस झाली आहे.
प्रत्येक मालगाडीला हळू चालावे लागते आणि रेल्वे येण्याच्या काही वेळापूर्वी फाटक बंद केले जाते.
रेल्वे प्रशासनाकडून एनटीपीसीशिवाय इतर रेल्वे गाड्यांसाठीही हा मार्ग उपलब्ध करून देत असल्याने समस्या निर्माण झाली आहे.
जर ट्रेन कळमना स्टेशनवर तांत्रिक बिघाडामुळे थांबत असल्यास तर त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग क्रॉसिंगवर असतो. यामुळे रेल्वे फाटक बंद ठेवल्या जाते.
या क्रॉसिंगच्या काही अंतरावर दुसरे क्रॉसिंग आहे. हे क्रॉसिंग मानवरहित आहे आणि येथूनही कोळशाच्या रेल्वेची वाहतूक होते.
या दोन्ही क्रॉसिंगच्या मध्ये एक १५ फुटाचा पूल आहे ज्याच्या खालून रेल्वे जाते.
अशी होते वाहतूक विस्कळीत
कळमना ते कामठीकडे जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे. या क्रॉसिंगच्या दोन्हीकडे मोठ्या संख्येत शाळा व महाविद्यालये आहेत.
जवळच रेल्वेचा गिट्टी यार्ड आहे. येथील ट्रकचीही वाहतूक याच मार्गावरून होते.
कार्यालयीन वेळेत वाहनांची संख्या सर्वाधिक असते.
ग्रामीण भागातील आॅटोरिक्षाचालक प्रवासी बसविण्याच्या स्पर्धेत वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करतात.
समस्येच्या निराकरणासाठी
उड्डाण पूल आवश्यक
समस्याच्या निराकरणासाठी या मार्गावर उड्डाण पूल आवश्यक आहे. परंतु तूर्तास तरी रेल्वे फाटक बंद ठेवण्याची वेळ कमी करावी.
कारण नसताना कळमना स्टेशनवर रेल्वे उभी करू नये.
वाहतूक पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी मिळून वाहतूक सुरळीत करावी.

Web Title: It is meant to be a fatal railway crossing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.