हिवाळी अधिवेशन: ही शिवसेना नव्हे तर 'सोनियासेना'; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 02:27 PM2019-12-17T14:27:17+5:302019-12-17T14:35:12+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात घेतलेला आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

It is not Shiv Sena but 'Sonia Sena'; BJP leader Sudhir Mungantiwar criticism on Shiv Sena | हिवाळी अधिवेशन: ही शिवसेना नव्हे तर 'सोनियासेना'; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका

हिवाळी अधिवेशन: ही शिवसेना नव्हे तर 'सोनियासेना'; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका

Next

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा प्रवास शिवसेना ते सोनियासेना असा झाला आहे असा हल्ला चढविला. 
सभागृहात बॅनर घेऊन आंदोलन करण्याची प्रथा सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीच आणली असून त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे असा आरोप मुनगंटीवार यांनी केला. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपा आमदारांकडून सभागृहात बॅनरबाजी करण्यात आली. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सभागृहात जे काही होतं ते रेकॉर्ड होत असतं. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी. जे तुम्ही लोकांना आश्वासन दिलं ते कधी देणार याची विचारणा आम्ही करतोय, आयुधांचा उपयोग करुन सत्ताधारी पार्टीने जनतेला जी आश्वासनं दिली ती पूर्ण करावी. वचननाम्यात जे शेतकऱ्यांसाठी मदतीच आश्वासन दिलं ते पूर्ण करा, बॅनर घेऊन आल्याचा राग का काढता? मुद्द्याऐवजी गुद्द्यावर चर्चा करता का? असा सवाल त्यांनी केला. 

तत्पूर्वी शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अतिवृष्टी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करा, अशी मागणीच त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे. विधानसभेच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते म्हणाले, आमचं काळजीवाहू सरकार होतं, त्यावेळी आम्ही कॅबिनेटमध्ये 10 हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती. त्यानंतर आमचं सरकार नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यासंदर्भातले जीआर काढू शकलो नाहीत असं त्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात घेतलेला आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी स्वत: अनेकवेळा रस्त्यावर उतरलो आहे. वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो, हे लोकांना कळलंय. जनतेला याची खात्री पटलीय, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन पाळणार हेही त्यांना कळलंय, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला
 

Web Title: It is not Shiv Sena but 'Sonia Sena'; BJP leader Sudhir Mungantiwar criticism on Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.