आपल्या प्रगल्भतेनेच कोरोनाचा पराभव शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 09:06 PM2020-04-06T21:06:13+5:302020-04-06T21:09:13+5:30

सरकारच्या दिशा-निर्देशांचे पालन करू तरच कोरोनाचा पराभव होईल आणि भारत सुरक्षित राहील.

It is possible to defeat Corona only with your awareness | आपल्या प्रगल्भतेनेच कोरोनाचा पराभव शक्य

आपल्या प्रगल्भतेनेच कोरोनाचा पराभव शक्य

Next
ठळक मुद्देसोशल डिस्टेन्सिंग होम क्वॉरंटाईनचे आवाहन


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून देशाला मुक्त करण्याच्या कार्यात आपणा सगळ्यांचीच भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लॉकडाऊनच्या काळात स्वत:ला होम क्वॉरंटाईन करत, सोशल डिस्टेन्सिंग पाळत प्रत्येकालाच देशहिताचे कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. सरकारच्या दिशा-निर्देशांचे पालन करू तरच कोरोनाचा पराभव होईल आणि भारत सुरक्षित राहील. लॉकडाऊनच्या काळात घराच्या बाहेर निघणाऱ्या व सोशल डिस्टेन्सिंग न पाळणाºया मुस्लिम समाजाला जबाबदार नागरिकांनी समजदारी दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाऊन पाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा
: प्रशासनाच्या इशाऱ्याकडे काही लोक दुर्लक्ष करत आहेत आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत. यामुळे आपलेच नुकसान आहे. यामुळे आपण आपल्या कुटुंबाला आणि देशाला संकटात टाकतो आहोत. आपल्या निष्काळजीपणाची शिक्षा संपूर्ण देशाला भोगावी लागेल. सोशल डिस्टेन्सिंग पाळल्याने कोरोनाशी लढता येईल. आपण आपले व्यवसाय पुन्हा एकदा सुरू करू शकतो. त्यामुळे सर्वांनीच भारताला कोरोनामुक्त करण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मौलाना सैयद आलमगीर अशरफ यांनी केले आहे.

सरकारच्या दिशानिर्देशाचे पालन करा 
: कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने विश्व स्वास्थ्य संघटनेच्या मार्गदर्शिकेनुसार योग्य पाऊले उचलली आहेत. त्याअनुसार सोशल डिस्टेन्सिंग जपणे, मास्क, सॅनिटायझरचा उपयोग करणे आणि होम क्वॉरंटाईनमध्ये राहणे गरजेचे आहे. आपण कुटूंबीयांसोबत घरीच राहून या संकटाला निस्तारण्यास सरकारला सहकार्य करू शकतो. कोरोनाला रोखण्यासाठी हे अत्यंत गरजेचे असल्याचे नागपूर मरकजचे सचिव हाजी अब्दुल बारी पटेल यांनी म्हटले आहे.

पैगंबरांनीही म्हटले होते घरी राहा 
: मोहम्मद पैगंबरांनीही अशा प्रकारच्या महामारीच्या काळात घरी राहण्याचे आवाहन केले होते. याचा उल्लेख हदीसे नबवीमध्ये आलेला आहे. अशाच प्रकारची महामारी त्यांच्या काळातही आली होती. त्यावेळी त्यांनी नागरिकांना घरी राहून एकदुसऱ्याशी दूर राहण्याची सूचना केली होती. ज्या प्रमाणे वाघ पुढे येताच आपण त्यापासू दूर पळतो. त्याच प्रमाणे ही महामारी आहे. म्हणूनच सोशल डिस्टेन्सिंग पाळून कुटूंबाला व देशाला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन शिक्षणतज्ज्ञ जफर अहमद खान यांनी केले आहे.

कोरोनाला हरविण्याची जबाबदारी आपलीच 
:आपल्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. या वैश्विक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने बाहेर निघण्यास मनाई केले आहे. याच प्रक्रीयेने कोरोनाला हरविता येणारआहे. आपल्याच समजदारीने भारत कोरोनामुक्त होईल. लॉकडाऊन आपल्या हिताचे असल्याची भावना मस्जिद अन्सार कमेटीचे अध्यक्ष हाजी मो. अलीमुद्दीन यांनी व्यक्त केली आहे.

होम क्वॉरंटाईन गरजेचे 
: सरकारने सगळ्यांच्याच फायद्यासाठी नियमावली तयार केली आहे आणि उपाययोजना सादर केल्या आहेत. सरकारच्या आदेशाचे पालन करत प्रत्येकाने स्वत:ला घरामध्ये क्वॉरंटाईन करणे गरजेचे आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ही चिंतेची बाब असून, यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सरकार व प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे समाजसेवक अफजल फारुख यांनी म्हटले आहे.

कोरोना विरूद्ध आपल्याला लढायचे आहे 
: सरकारने जबाबदारीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारचे हे पाऊल पूर्णपणे जनहित, देशहिताचे आहे. आपण या नियमांचे पालन करणार नाही तर स्थिती बिकट होईल. त्यामुळे घरी राहून सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करावेच लागेल असे आवाहन मरकजी सिरतुन्नबी कमेटीचे अध्यक्ष परवेज रिजवी यांनी केले आहे.

Web Title: It is possible to defeat Corona only with your awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.