गुरुवारी बरसला, शुक्रवारी थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:59+5:302021-07-10T04:07:59+5:30
गुरुवारी सकाळपासून पावसाची धुवाधार सुरुवात झाली. सकाळी ११ पासून दुपारी ३ वाजतापर्यंत जाेरदार सरी काेसळल्या. त्यानंतरही रात्रीपर्यंत रिपरिप कायम ...
गुरुवारी सकाळपासून पावसाची धुवाधार सुरुवात झाली. सकाळी ११ पासून दुपारी ३ वाजतापर्यंत जाेरदार सरी काेसळल्या. त्यानंतरही रात्रीपर्यंत रिपरिप कायम हाेती. त्यामुळे पुन:श्च हरिओम करणारा पाऊस पुढचे काही दिवस मुक्काम करील, असे वाटत हाेते. हवामान विभागानेही दाेन-तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करीत नागपूरसह विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केले हाेते. नदी, नाले, रस्ते ओसंडून वाहत हाेते. वस्त्यांमध्येही पाणी शिरले. एकाच दिवशी पावसाने शंभरी गाठली. नागपुरात १००.४ मि.मि. पावसाची नाेंद करण्यात आली. शुक्रवारी सकाळपर्यंत ढगाळ वातावरण हाेते. त्यानंतर मात्र आकाश खुले व्हायला लागले. ऊनसावलीचा खेळ दिवसभर चालला; पण पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे नागपूरच्या तापमानात ७.९ अंशांची वाढ नाेंदविण्यात आली. तसेच गाेंदियामध्ये ७.५ व वर्ध्यामध्ये ६.८ अंशांची वाढ झाल्याचे नाेंदविण्यात आले. दरम्यान, हवामान खात्याने चंद्रपूरसह काही भागांत जाेरदार पाऊस हाेण्याचा अंदाज वर्तविला आहे.