कठीण परिस्थितीतच होते आत्मशक्तीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:07 AM2021-04-24T04:07:58+5:302021-04-24T04:07:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सद्य:स्थितीत देश व शिक्षणक्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. आव्हानांना न घाबरता त्यांचा सामना केला पाहिजे. ...

It was a difficult situation | कठीण परिस्थितीतच होते आत्मशक्तीची परीक्षा

कठीण परिस्थितीतच होते आत्मशक्तीची परीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सद्य:स्थितीत देश व शिक्षणक्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. आव्हानांना न घाबरता त्यांचा सामना केला पाहिजे. कठीण परिस्थितीतच आत्मबलाची परीक्षा होते व अशा स्थितीत केलेले प्रयत्न यशाच्या मार्गावर नेतात, असे मत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव प्रा.सच्चिदानंद जोशी यांनी व्यक्त केले. भारतीय शिक्षण मंडळाच्या ५२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

यावेळी भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर हेदेखील उपस्थित होते. वर्तमान स्थितीतील आव्हानेदेखील आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकवत आहेत. रचनात्मकता, संयम, करुणा, सहयोग व साहस यांच्या माध्यमातून अशक्य बाबदेखील शक्य होऊ शकते हा विश्वासही स्थिती देत आहे. एकदुसऱ्यांना सहकार्य करतच देशाला प्रगतिपथावर न्यायचे आहे, असे प्रतिपादन प्रा.जोशी यांनी केले. आत्मीय संबंध ही आदर्श समाजाची ओळख आहे. यातूनच भारतीय संस्कृती दिसून येते. संपर्क व संवादातून आत्मीय संबंधांचा पाया रचला जातो व कठीण परिस्थितीत हीच बाब संजीवनीचे कार्य करते. आज संवादाची साधने वाढली आहेत. मात्र, संवाद कमकुवत झाला आहे. कुठल्याही संस्थेसाठी सशक्त संवाद अत्यावश्यक असतो. यातूनच राष्ट्रनिर्माणात एकतेचे महत्त्व कळते, असे मुकुल कानिटकर म्हणाले. यावेळी त्यांनी नवीन भारतीय शिक्षण धोरणासंदर्भात भारतीय शिक्षण मंडळाने केलेल्या कार्यांवर प्रकाश टाकला. महामंत्री उमाशंकर पचौरी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: It was a difficult situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.