रेल्वेत चणे विकणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:07 AM2021-01-18T04:07:49+5:302021-01-18T04:07:49+5:30

आरपीएफने पकडले : रेल्वे न्यायालयासमोर करणार हजर नागपूर : रेल्वे प्रशासनाने अधिकृत परवाना दिलेला नसताना अवैधरित्या रेल्वेत चणे विकणाऱ्या ...

It was expensive to sell gram on the railways | रेल्वेत चणे विकणे पडले महागात

रेल्वेत चणे विकणे पडले महागात

Next

आरपीएफने पकडले : रेल्वे न्यायालयासमोर करणार हजर

नागपूर : रेल्वे प्रशासनाने अधिकृत परवाना दिलेला नसताना अवैधरित्या रेल्वेत चणे विकणाऱ्या तीन अवैध व्हेंडरना रेल्वे सुरक्षा जवानांनी अटक करून त्यांच्याविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४४ नुसार गुन्हा दाखल केला.

सतीश सीताराम निरापुरे (५०, रा. भीमनगर आमला), अनिल रणधीर दुबे (३६, रा. रामनगर वॉर्ड नं. २५), बैतुल आणि अमित टेकचंद बोरकर (२०, रा. कामगारनगर कामठी’ अशी अटक केलेल्या अवैध व्हेंडर्सची नावे आहेत. ते रेल्वेगाडी क्रमांक ०२७२२ हजरत निजामुद्दीन-हैदराबाद विशेष रेल्वेगाडीत चणे विकत होते. त्यांना मुद्देमालासह पकडून आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. सोमवारी त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये समोसे विकणाऱ्या अवैध व्हेंडरला आरपीएफचे जवान दिसताच त्यांनी समोसा ठेवलेले बॉक्स गाडीतच ठेवून पळ काढला. आरपीएफ जवानांनी हे बॉक्स ताब्यात घेतले आहेत.

...............

Web Title: It was expensive to sell gram on the railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.