स्वत:चेच वाहन ठरले ‘त्याचा’ काळ

By admin | Published: September 27, 2015 02:19 AM2015-09-27T02:19:19+5:302015-09-27T02:19:19+5:30

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका विचित्र अपघातात एका माजी नगरसेवकाच्या तरुण मुलाचा करुण अंत झाला.

It was his own vehicle, his time | स्वत:चेच वाहन ठरले ‘त्याचा’ काळ

स्वत:चेच वाहन ठरले ‘त्याचा’ काळ

Next

माजी नगरसेवकाच्या मुलाचा
अपघाती मृत्यू : हिल टॉप येथील घटना

नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका विचित्र अपघातात एका माजी नगरसेवकाच्या तरुण मुलाचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास हा अपघात घडला. रामनारायण शशिशंकर शुक्ला (वय १९) असे मृताचे नाव असून, माजी नगरसेवक शशिशंकर शुक्ला यांचा तो मुलगा होय.
शुक्ला यांचे हिल टॉप पाण्याच्या टाकीजवळ जगदंबा ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. येथून ते बांधकामाशी संबंधित साहित्याचा पुरवठा करतात. शनिवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास रामनारायण त्याची बोलेरो (एमएच ४०/ एन ३६९) ही मालवाहू वाहन रिव्हर्स घेत होता. रस्त्याची एक बाजू ओबडधोबड असल्यामुळे बोलेरो उजव्या बाजूने उलटली. ड्रायव्हर सिटच्या दाराच्या खिडकीतून रामनारायण डोके बाहेर काढून वाहन रिव्हर्स घेत असल्यामुळे त्याच्या डोक्याचा भाग बोलेरोखाली दबला.
त्याला तातडीने बाजूच्या खासगी इस्पितळात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातामुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली. जयशंकर शामनाथ शुक्ला (वय ४२) यांच्या सूचनेवरून अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहचले. रामनारायण याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष निघाल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.व्यवसायाच्या भरभराटीसाठी रामनारायण मोठी धडपड करीत होता. ग्राहकांच्या आॅर्डरनुसार, तो स्वत:च वाहनात साहित्य भरून त्याची ने-आण करायचा.
दिवसरात्र त्याची धावपळ सुरू राहायची. त्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)

वाडीतही अपघात
दुसरा अपघात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास अमरावती मार्गावरील अशोका लॉनजवळ घडला. भरधाव कार (एमएच ३१/ जी ६१८७) चालकाने एका ५० ते ५५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीला धडक दिली. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वाडी पोलिसांनी आरोपीचालक अजय वसंतकुमार मुखर्जी (वय ३९, रा. गांधीचौक सदर) याला अटक केली.

Web Title: It was his own vehicle, his time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.