'मनीषनगर अंडरपास'नेच पाडले महामेट्राेच्या दाव्याचे पितळ उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 02:32 PM2022-07-20T14:32:50+5:302022-07-20T14:38:53+5:30
सिमेंट राेडची डाेकेदुखी, ड्रेनेज सिस्टीमचा अभाव, दर पावसात भरते पाणी
आशिष रॉय
नागपूर : मनीषनगर अंडरब्रिजमध्ये नरेंद्रनगर पुलाप्रमाणे पाणी साचणार नाही, असा दावा महामेट्राेने बांधकामादरम्यान केला हाेता. मात्र दाेनच वर्षात महामेट्राेच्या दाव्याचे पितळ उघडे पडले आहे. अत्याधुनिक तंत्राने आरयूबीचे बांधकाम करण्याचा दावा केला असताना पाऊस हाेताच पुलाखाली तलाव साचत असल्याचे दिसते. अनेकदा या पुलाखालून जाणेही अशक्य हाेते.
येथील स्थिती पाहता महामेट्राेने आरयूबीवर बनविला; पण पाणी निकासीसाठी आवश्यक ड्रेनेज सिस्टीम तयार केली नाही. याच कारणाने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण हाेते. नागपूर महापालिकेने एप्रिलपासून या पुलाच्या देखभाली दुरुस्तीची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र परिस्थिती सुधारण्याचे चित्र नाही. या पावसाळ्यातही अनेक दिवस या पुलाखाली माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते.
ड्रेनेज सिस्टीम ठीक नाही
मनीषनगर निवासी सुहास नायसे यांनी राेजची समस्या मांडली. आरयूबीचे ड्रेनेज सिस्टीम याेग्य नसल्याने अनेकदा पाणी साचले असते व वाहन काढणे कठीण जाते. सरकारने ही समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी त्यांनी केली.
राेजचा मनस्ताप
स्थानिक निवासी मुकेश देवरे यांनी खाेटे दावे करण्यासाठी मेट्राे प्रबंधनावर टीका केली. पावसाळ्यात मनीषनगरच्या नागरिकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागताे. ड्रेनेज सिस्टीम नसल्याने आरयूबीखाली पाणी साचले असते. नरेंद्रनगर पुलाखालीही गुडघाभर पाणी साचलेले राहते. त्यामुळे लांब चक्कर मारून मनीषनगर ओव्हरब्रिजचा वापर करावा लागताे. यामुळे वेळेसह पेट्राेलचा खर्च वाढताे.
अधिकाऱ्यांची जबाबदारी : येरावार
माजी नगरसेवक मदन येरावार म्हणाले, ४ मार्चला नगरसेवकांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. यामुळे आरयूबीची समस्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. अधिकारी माजी नगरसेवकांचा फाेन उचलत नाही किंवा अरेरावीने बाेलतात. प्रशासनाने शहरात मान्सूनपूर्व तयारी केली नाही.
अतिपावसामुळे समस्या : मेट्रो
मेट्राेच्या अधिकाऱ्यांच्या मते रस्ता उंच झाल्याने आरयूबीखाली पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. दुसरीकडे यावर्षी पावसाचा जाेर अधिक असल्यानेही समस्या वाढली असल्याचे ते म्हणाले.