अजित पवार नव्हे शरद पवारांशीच केली होती सरकार स्थापनेची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:08 AM2021-01-18T04:08:59+5:302021-01-18T04:08:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नोव्हेंबर २०१९मध्ये राज्यात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेच भाजपकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी भाजपची चर्चा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोव्हेंबर २०१९मध्ये राज्यात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेच भाजपकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी भाजपची चर्चा अजित पवार नव्हे
नोव्हेंबर २०१९मध्ये जे काही घडले ते मी का केले, असे अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. मात्र, त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरविले असल्याचे आम्हाला कळाले. त्यानंतर १० ते १२ दिवस आम्ही विविध पर्यायांवर विचार केला व राष्ट्रवादीशी बोलणी केली. आम्हाला सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडूनच आला होता. आमची बोलणीदेखील जवळपास अंतिम झाली होती. सरकार बनविण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. अगदी खातेवाटप, जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील निश्चित केले. विशेष म्हणजे आमची चर्चा अजित पवारांशी नव्हे
‘फेसबुक लाईव्ह’ची ‘लिंक’ हटविली
देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यक्रमाचे ‘फेसबुक’वर ‘लाईव्ह’ सुरू होते. या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांचे कॅमेरे नाहीत म्हणून मी दिलखुलासपणे बोलू शकतो, असे फडणवीस म्हणाले. शरद पवारांबाबत त्यांनी वक्तव्य केल्यानंतर काही वेळातच ‘फेसबुक लाईव्ह’च बंद झाले. याशिवाय ‘फेसबुक लाईव्ह’ची ‘लिंक’देखील हटविण्यात आली. अशा प्रकारे ‘लिंक’ हटविण्याचे गुपित काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.