.... तरच होईल अकरावीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:28 AM2018-06-04T11:28:18+5:302018-06-04T11:28:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल लागलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण स्टेट बोर्डात घ्यायचे असेल, त्यांनी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या केंद्रावर आॅनलाईन अर्जाचा भाग १ भरावा. भाग-१ भरल्यानंतरच सीबीएसई व आयसीएसई बोर्डातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्टेट बोर्डात प्रवेश निश्चित होईल.
११ वी कला, विज्ञान, वाणिज्य व एमसीव्हीसी चे प्रवेश आॅनलाईन प्रक्रि येद्वारे केले जाणार आहेत. शहरातील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकरिता त्यांच्याच शाळेत माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी १० वी आॅनलाईन निकाल घोषित होण्यापूर्वी आॅनलाईन अर्जाचा भाग १ भरायचा आहे. शाळेकडून व्हेरीफाईड करून घ्यावयाचे आहे. ज्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी अजूनपर्यंत माहिती पुस्तिका नेलेल्या नसतील त्यांनी त्वरित विद्यार्थ्यांकरिता माहिती पुस्तिका मुख्य मार्गदर्शन केंद्राकडून प्राप्त कराव्यात.
सीबीएसई व आयसीएसई तसेच इतर मंडळाचे निकाल घोषित झालेले असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी आॅनलाईन गुणपत्रिकेची प्रत घेऊन मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधून माहिती पुस्तिका प्राप्त कराव्यात. आॅनलाईन अर्जाचा भाग १ भरावा व मार्गदर्शन केंद्राकडून व्हेरीफाईड करून घ्यावा. व्हेरीफाईड न केल्यास आॅनलाईन अर्जाचा भाग २ (आॅप्शन फॉर्म) भरता येणार नाही.
अर्जात द्विलक्षी अभ्यासक्रमाचा पर्याय निवडावा
२०१८-१९ पासून द्विलक्षी विषयांचे प्रवेश शून्य फेरीमध्ये आॅनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना द्विलक्षी अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाच्या भाग १ मध्ये द्विलक्षी अभ्यासक्रमाला पर्याय निवडावा.