यंदा लवकरच येईल पाऊस... बाहवा, पावशा देताहेत संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2022 08:45 AM2022-05-08T08:45:00+5:302022-05-08T08:45:01+5:30
Nagpur News महाराष्ट्रात बाहवाच्या झाडावर एप्रिल महिन्यात फुले आली असून, पावशा पक्षीही किलबिलाट करताना दिसत आहे. पर्यावरणप्रेमी या आधारावर लवकरच पाऊस येणार असल्याचा अंदाज लावत आहेत.
वसीम कुरेशी
नागपूर : पावसाच्या लवकर येण्याबाबत निसर्ग वेगवेगळे संकेत देत आहे. तर विज्ञान त्याच्या अंदाजासाठी काही वेगळे इशारे मिळण्याची वाट पाहत आहे. महाराष्ट्रात बाहवाच्या झाडावर एप्रिल महिन्यात फुले आली असून, पावशा पक्षीही किलबिलाट करताना दिसत आहे. पर्यावरणप्रेमी या आधारावर लवकरच पाऊस येणार असल्याचा अंदाज लावत आहेत.
पर्यावरणप्रेमी रवींद्र गोरे (अहमदनगर) यांच्यानुसार बाहवाची झाडे पिवळ्या रंगाच्या फुलांनी बहरली आहेत. जुन्या अनुभवाच्या आधारे हा लवकरच पाऊस येणार असल्याचा इशारा आहे. याशिवाय पावशा पक्षीही किलबिलाट करताना दिसून येत आहे. पावसाळ्याच्या ६० दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या घटनांमुळे मेच्या अखेरपर्यंत पाऊस येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एका सामाजिक मान्यतेनुसार जेव्हा कावळा झाडाच्या मधील भागावर घरटे बांधतो, तेव्हा लवकरच पाऊस येतो. प्रदेशात काही ठिकाणी झाडाच्या मध्यभागी अशीच कावळ्यांची घरटी दिसत आहेत.
वैज्ञानिक आधारावरच अंदाज
‘हवामानानुसार पक्ष्यांचा व्यवहार बदलतो, हे खरे आहे. पावसाळ्याबाबत असे अनेक समज आहेत. परंतु, आमचे विश्लेषण व पूर्व अंदाज हा वैज्ञानिक आधारावरच असतो.’
- एम. एल. साहू, प्रादेशिक हवामान केंद्र प्रमुख, नागपूर
...........