बॅकलॉग भरून काढण्याला वेळ लागणार-आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:11 AM2021-09-09T04:11:46+5:302021-09-09T04:11:46+5:30
... बॅकलॉग भरून काढण्याला वेळ लागेल- आयुक्त राज्य सरकारच्या निर्देशानुसार दोन वर्षांत कोरोना संक्रमण काळात कोणतीही नवीन कामे सुरू ...
...
बॅकलॉग भरून काढण्याला वेळ लागेल- आयुक्त
राज्य सरकारच्या निर्देशानुसार दोन वर्षांत कोरोना संक्रमण काळात कोणतीही नवीन कामे सुरू झाली नाहीत. मनपाची आर्थिक स्थितीही चांगली नव्हती. गेल्या वर्षी ५ शीर्षकांत ६५ कोटींच्या कामाला मंजुरी दिली; परंतु एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. जूनमध्ये पावसाळा सुरू झाला. यामुळे वित्त वर्षात अर्थसंकल्पातील कामे सुरू करता आली नाहीत. दोन वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याला थोडा वेळ लागेल. ६५ हजार चौरस मीटर खड्डे बुजवले आहे. नासुप्र, बांधकाम विभाग, मेट्रो व राष्ट्रीय महामार्ग यांची कामे सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी दिली.
..
खड्डे बुजवण्याची जबाबदारी मनपाची-महापौर
शहरातील रस्ते कुणाचेही असो. दुरुस्ती व खड्डे बुजवण्याचे काम मनपाचे आहे. मनपाने अन्य विभागांना खड्ड्यांसंदर्भात पत्र दिले आहे का? असेल तर याची माहिती महापौर कार्यालयाला द्या, जे अधिकारी फोन उचलत नाहीत. त्यांच्यावर नियमानुसार आयुक्तांनी कारवाई करावी. आयुक्त करत नसेल तर सभागृहाला कारवाईचे अधिकार आहेत. बांधकाम विभागातील कमलेश चव्हाण फोन उचलत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करा, तसेच काम न करणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.