सरकारच्या जनविरोधी धोरणाचा आयटकतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:08 AM2021-09-25T04:08:10+5:302021-09-25T04:08:10+5:30

नागपूर : अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी, उमेद व योजना कर्मचारी आयटक कामगार संघटनांनी सरकारच्या जनविरोधी ...

ITC protests the government's anti-people policy | सरकारच्या जनविरोधी धोरणाचा आयटकतर्फे निषेध

सरकारच्या जनविरोधी धोरणाचा आयटकतर्फे निषेध

Next

नागपूर : अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी, उमेद व योजना कर्मचारी आयटक कामगार संघटनांनी सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध केला. पोषण ट्रॅकर ॲप मराठी भाषेत करावे, खराब झालेले मोबाईल बदलून द्यावे, सर्व योजना कामगारांना २१ हजार रुपये वेतन द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आयटकचे श्याम काळे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी रेखा कोहाड, ज्योती अंडरसहारे, आशा बोदलखंडे, संगीता गौतम, गायत्री थोटे, फुलन घुटके, ज्योती उमक, मीना सोमकुवर, अरुण वनकर, चंद्रशेखर मौर्य, प्रशांत दीक्षित, युगल रायलु, उषा चारभे, करुणा साखरे, जयश्री चंहादे, शालिनी मुरारकर, प्रीती राहुलकर, वनिता कापसे, कल्पना शेवाळे, मंगला रंगारी, सुनीता पाटील, सीमा गजभिये, भारती नगरकर, अश्विनी डेहनकर, पौर्णिमा वासे, ज्योती रक्षित, शीतल मेश्राम, कौशल्या गणोरकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: ITC protests the government's anti-people policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.