असा मुलगा मिळणे माझे भाग्यच !!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 09:36 PM2018-05-30T21:36:00+5:302018-05-30T21:36:11+5:30

दोन वर्षांपासून वडील अर्धांगवायूच्या धक्क्याने ग्रस्त. त्यामुळे आर्थिक बाजूही कमकुवतच. अशात वडिलांची काळजी, घरात आईला मदत, घरात असल्या नसल्याची तडजोड करून अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. आज तो पहिला आलाय, याचा अतिशय आनंद होत आहे. मला शब्दच सुचत नाही. पण एक आई म्हणून असा मुलगा मिळणे माझे भाग्यच आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया आदित्यची आई मंजू डोकवाल यांनी दिली.

It's my fate to get such a boy !!! | असा मुलगा मिळणे माझे भाग्यच !!!

असा मुलगा मिळणे माझे भाग्यच !!!

Next
ठळक मुद्देबारावीत विदर्भातून पहिला आलेल्या आदित्यच्या आईची भावनिक प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षांपासून वडील अर्धांगवायूच्या धक्क्याने ग्रस्त. त्यामुळे आर्थिक बाजूही कमकुवतच. अशात वडिलांची काळजी, घरात आईला मदत, घरात असल्या नसल्याची तडजोड करून अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. आज तो पहिला आलाय, याचा अतिशय आनंद होत आहे. मला शब्दच सुचत नाही. पण एक आई म्हणून असा मुलगा मिळणे माझे भाग्यच आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया आदित्यची आई मंजू डोकवाल यांनी दिली.
डॉ. आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी आदित्य सुरेंद्रकुमार डोकवाल याने बारावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळविले आहे. आदित्यने मिळविलेल्या गुणांमुळे त्याने प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तसा आदित्य मुळातच हुशार, दहावीतसुद्धा त्याने ९८ टक्के गुण घेतले होते. मुलगा हुशार असल्याने त्याच्या कुटुंबाने पुढच्या शिक्षणासाठी वर्धा सोडून नागपूर गाठले. याच दरम्यान त्याच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. आदित्य घरात एकटाच असल्याने घरातील सर्व जबाबदारी त्याच्यावर आली. पण त्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. कुठल्याच गोष्टीचा घरात कधी हट्ट केला नाही. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या आजच्या मुलांमध्ये आदित्य अपवाद आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना आदित्य म्हणाला की, जबाबदारी ही सर्वकाही शिकवून जाते.
न्यूरो सर्जन व्हायचे आहे
आदित्यचे बालपणापासूनचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते. त्या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्नही सुरू आहेत. नीटची परीक्षा त्याने दिली आहे. वडिलांचे आजारपण हे त्याला आणखी जास्त वैद्यकीय क्षेत्राचे वेध लावून गेले. ज्या डॉक्टरांकडून त्याच्या वडिलांवर उपचार सुरू आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आदित्यनेसुद्धा न्यूरो सर्जन बनण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: It's my fate to get such a boy !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.