सीबीएसईच्या दहावीच्या निकालासाठी लागतोय उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:58+5:302021-07-24T04:06:58+5:30
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल घोषित झाला. परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी ...
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल घोषित झाला. परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. कारण सीबीएसईच्या शाळांना निकाल तयार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मूल्यांकनाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही.
सीबीएसईच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक अडचणीमुळे निकाल जुलैच्या शेवटी अथवा ऑगस्ट महिन्यात लागू शकतो. सीबीएसईने बारावीच्या निकाल जास्त फोकस केला आहे. सीबीएसईच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, बारावीचे निकाल घोषित झाल्यानंतर दहावीच्या निकालाचे काम सुरू होईल. त्यामुळे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दहावीचा निकाल घोषित होईल.
राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल १६ जुलैला घोषित केला. सीबीएसईने सुद्धा दहावी व बारावीचे निकाल शनिवारी घोषित करण्याची घोषणा केली होती. पण मूल्यांकनात आलेल्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- लवकरच समस्या सुटेल
यासंदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रण डॉ. संयम भारद्वाज यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की काही अडचणी येत आहे. त्या लवकरच दूर करण्यात येईल. दहावीचे निकाल लवकरच घोषित करण्यात येईल.