जे. एस . - ३ डी इंट्राओरल डिजिटल मॅपरचे डिझाइन बनविण्यासाठी पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:45+5:302021-09-08T04:12:45+5:30

वानाडोंगरी : दंत वैदक शास्त्रात नवनवीन संशोधन कार्य करण्यासाठी वानाडोंगरी येथील स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय आणि रुग्णालय ...

J. S. - Patent for design of 3D intraoral digital mapper | जे. एस . - ३ डी इंट्राओरल डिजिटल मॅपरचे डिझाइन बनविण्यासाठी पेटंट

जे. एस . - ३ डी इंट्राओरल डिजिटल मॅपरचे डिझाइन बनविण्यासाठी पेटंट

Next

वानाडोंगरी : दंत वैदक शास्त्रात नवनवीन संशोधन कार्य करण्यासाठी वानाडोंगरी येथील स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय आणि रुग्णालय नेहमीच आघाडीवर राहिले आहे. महाविद्यालयाची दंत परिवेष्टनशास्त्र विभागाची पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. जिज्ञासा साहू हिने प्रा. डॉ. दीप्ती गट्टाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित केलेल्या इंट्राओरल डिजिटल मॅपर डिझाइनला भारत सरकारने पेंटची मान्यता प्रदान केलेली आहे. सदर उपकरण हे थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाशी अनुरूप असून,

तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे. या आधीच महाविद्यालयाचे डॉ. देवेंद्र सोरटे यांना हर्निया दुरुस्ती शस्त्रक्रियेसाठी केलेल्या डिव्हाइसच्या नावीन्यपूर्ण डिझाइनसाठी पेंटट प्रदान करण्यात आले आहे. संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक कीर्तीच्या संशोधकांच्या नावाने पुरस्कार जाहीर केले आहेत. अलीकडेच महाविद्यालयाने नवीन फॉम्युर्लेशनसह एमटीए (एन्डोडॉन्टिक रितनरेटिव्ह मटेरियल)च्या प्रक्रियेच्या विकासाठी आयसीटी, मुंबईसोबत सामंजस्य करार केला आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) अंतर्गत पंतप्रधान फेलोशिपसाठी निवडला गेला आहे. या यशाबद्दल आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमाला डॉ. अरुण साजनकर, डॉ. जुझर रसुल, डॉ. दीप्ती गट्टाणी, डॉ. जिज्ञासा साहू, डॉ. रश्मी जावेडकर, डॉ. संजय पाटील, डॉ. अजय खाडे, डॉ. नम्रता खेताल, डॉ. स्नेहल वाहणे आदी उपस्थित होते.

Web Title: J. S. - Patent for design of 3D intraoral digital mapper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.