‘जय भवानी, जय शिवाजी’ने दुमदुमले शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:10 AM2021-02-21T04:10:23+5:302021-02-21T04:10:23+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात जल्लोषात साजरी करण्यात आली. विविध ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात जल्लोषात साजरी करण्यात आली. विविध संघटनांनी या निमित्ताने महाराजांना मानवंदना वाहिली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी व्याख्याने, पोवाडे गायन, स्पर्धांचे आयोजन झाले. या सोहळ्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच हिरहिरीने सहभागी झाले.
कमांडो जिम, ओंकारनगर ()
ओंकारनगर येथील कमांडो जिमच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने युवा अभिनेता आदित्य लोहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र उलगडून दाखवले आणि वर्तमानात त्यांची निती कशी योग्य आहे, ते सांगितले. याप्रसंगी अजय सेलोकर, अमोल गेडाम, अजय कासूलकर, हरिश ठोंबरे, नितीन रोकडे, अजय सिंग, मोहन दिवटे, सिकंदर कुकाड उपस्थित होते.
युवा चेतना मंच, नागलवाडी ()
युवा चेतना मंचच्या वतीने नागलवाडी येथील मांग गारुडी समाजातील कचरा वेचणाऱ्या मुलांसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती साजरी करण्यात आली. निखिल निमसटकर व विशाल बोढखे यांनी मुलांना महाराजांचे चरित्र उलगडून दाखवले. प्रवीण घरजाळे यांनी शिवगीत सादर केले. याप्रसंगी आशिष खडके, डॉ. संदीप आकरे, महेश महाडिक, अभिषेक सावरकर, डॉ. श्रुती आष्टनकर, तेजस गोंधळेकर, हिमांशू उपरकर, अमीत वानखेडे, शुभम शेलार, ओम आरेकर, जगदीश वानोडे, रूपाली नाटकर उपस्थित होते.