कन्हैयाकडून दीक्षाभूमीवर जय भीमचा घोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2016 03:05 AM2016-04-15T03:05:15+5:302016-04-15T03:05:15+5:30

कन्हैया कुमार याने गुरुवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्याने मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करीत बुद्धवंदना केली.

Jai Bhimacha Ghosh on Dikshitabhoomi from Kanhaiya | कन्हैयाकडून दीक्षाभूमीवर जय भीमचा घोष

कन्हैयाकडून दीक्षाभूमीवर जय भीमचा घोष

Next

नागपूर : कन्हैया कुमार याने गुरुवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्याने मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करीत बुद्धवंदना केली. यावेळी कन्हैयाकुमार याला भेटण्यासाठी व पाहण्यासाठी तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता.
कन्हैयाकुमार सकाळी ११ वाजता दीक्षाभूमीवर पोहचला. त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आणि सलील देशमुख होते. अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कन्हैया दीक्षाभूमीवर दाखल झाला. तो थेट दीक्षाभूमीवरील मध्यवर्ती स्मारकात गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन त्याने बुद्धवंदना म्हटली. यानंतर बाहेर येऊन कन्हैया कुमार याने जय भीमच्या घोषणा देत, बाबा तेरा मिशन अधुरा, हम सब मिलकर करेंगे पुरा... संघवादसे आझादी... अशा घोषणा दिल्या. यावेळी त्याला पाहण्यासाठी लोकांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये मोठा उत्साह होता. मध्यवर्ती स्मारकापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत पोहचण्यासाठी त्याला बराच वेळ लागला. मोबाईलवर त्याचे छायाचित्र काढण्यासाठी स्पर्धा लागली होती.(प्रतिनिधी)

Web Title: Jai Bhimacha Ghosh on Dikshitabhoomi from Kanhaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.