उपराजधानीत सर्वत्र ‘जय भीम’चा गजर

By admin | Published: April 15, 2016 03:19 AM2016-04-15T03:19:38+5:302016-04-15T03:19:38+5:30

अखिल भारतीय धम्मसेना व आनंद बुद्धविहार कमिटी, आनंदनगर, सीताबर्डीच्या वतीने

Jai Bhim's alarm in all over the sub-principality | उपराजधानीत सर्वत्र ‘जय भीम’चा गजर

उपराजधानीत सर्वत्र ‘जय भीम’चा गजर

Next

अवतरली निळाई : विविध संस्था, संघटनांचा पुढाकार
अखिल भारतीय धम्मसेना
अखिल भारतीय धम्मसेना व आनंद बुद्धविहार कमिटी, आनंदनगर, सीताबर्डीच्या वतीने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी महापौर प्रवीण दटके, धम्मसेनेचे शहर अध्यक्ष रविभाऊ शेंडे, भय्यालाल भोतमांगे उपस्थित होते. याप्रसंगी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी सुखदेव मेश्राम, भरत लांडगे, उत्तम पाटील, सुधीर ढोके, पिंटू शेंडे, चेतन खोब्रागडे, मिलिंद मेश्राम, जितू पाटील, मंगेश वानखेडे, राजेश रायपुरे, सुशील बागडे, नरेश गोटेकर, किशोर कोल्हटकर आदी उपस्थित होते.

केंद्रीय जनविकास पार्टी
पार्टीचे अरुण मुखर्जी व चेतन राजकारणे यांनी संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी डॉ. भालचंद्र कापरे, शशांक चव्हाण, भास्कर हातमोडे, नितीन गचके, मोहन नारके, नरेश पाचपोर, शैलेश कराडे, मनीष मंडपे, पुजा भित्रे, राकेश ठाकूर, निशांत धोपटे, करण रुद्रकार, देवा कराडे, श्याम मलवे, राहू हटवार, शैलेश पात्रीकर, अ‍ॅड. प्रतीक थुल आदी उपस्थित होते.

किंग कोबरा आॅर्गनायझेशन युथ फोर्स
सामाजिक संघटन किंग कोबरा व राष्ट्र निर्माण संस्थेतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अरविंदकुमार रुतडी, संजय पाचभुते, अमोल लोंदासे, अमित कातुरे, ऋषिराज भुते, डॉ. सुशांत पिसे, डॉ. प्रमोद माळवे, प्रमोद व्यास, राहुल पडोळे, राजू बाळसराफ, विनोद सोनुले, सचिन मोहोड, बब्बू शेख, हारुण पठाण, वसीम शेख, अतुल पिंपडकर, सुदेश पोहरे, रसिद खान, विनायक श्रोते, फाल्गुनी रुतडी, खुशी उमाठे, सुनीता रुतडी, कविता यादव उपस्थित होते.

महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग
संस्थेचे उपाध्यक्ष गुलाबराव चिमोटे यांच्या अध्यक्षतेत व सरचिटणीस प्रा. सुरेंद्र आर्य यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित पाहुण्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी प्रकाश देवते, अश्विनी बोराडे, अनिता डंगरे, धनराज फरकाडे, विजय भोयर, आशिष चिमणकर, हेमप्रकाश गायकवाड, माधव घोळसे, महादेवराव दंढारे, अरुण भोयर, नीलय चोपडे, महादेव हरणे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त रघुजीनगर येथील मंडळाच्या सभागृहात ३२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. राजेश नाईक, आरटीओचे निरीक्षक जयंत मोरे, विलास ठेंगणे, अरुण कापसे, स्वाती चहांदे, प्रकाश कोहळे आदी उपस्थित होते.

सामाजिक एकता ग्रंथालय
संजयगांधी नगर येथील सामाजिक एकता ग्रंथालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेचे सचिव ओमप्रकाश सोमकुंवर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अ‍ॅड. जिजा सोमकुंवर, रसिका गोखले, अनुष्का डोंगरे, अलिसबा शेख हुसैन, खुशी तेलंगे, प्रशिक फुलझेले, क्रिष्णा बेलसरे, प्रांजली बोरकर, धीरज पाटील, देवानशिका बारापात्रे, संस्कृती साखरे आदी उपस्थित होते.

सेवाभावी मंदा बहुउद्देशीय समाज विकास संस्था
संस्थेच्या अध्यक्ष मंदा वैरागडे यांनी संविधान चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी सरोज आगलावे, सरोज देशमुख, संदीप कासे, राजा पाटील, कुंदा आठवले, मनीषा पांडे, मोती राठी, नीता कुळकर्णी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया
पार्टीच्या वतीने संविधान चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकास गणवीर, सचिव सतीश तांबे, प्रा. पवन गजभिये, कांतीलाल पखिड्डे, राजन वाघमारे, हरीश लांजेवार, विनोद थूल, बाळू हाडके, नितीन तांबे, प्रकाश कांबळे, सचिन झोडापे, प्रतिभा रामटेके, सतीश रामटेके उपस्थित होते.

आदर्श विद्या मंदिर
गांधीबाग येथील आदर्श विद्या मंदिरात आयोजित कार्यक्रमाला माजी प्राचार्य अरविंद खांडेकर, रामरतन सारडा, गोविंदलाल सारडा, प्राचार्य आशनारायण तिवारी उपस्थित होते. संचालन राजश्री बनसोड यांनी केले. आभार मनीषा शंभरकर यांनी मानले. कार्यक्रमाला अशोककुमार कोठारी, ब्रिजलाल सारडा, प्रकाश सोनी, नरसिंह सारडा, माजी प्राचार्य ओम आचार्य, मुख्याध्यापक किशोर बावनगड, मुख्याध्यापिका सुषमा शर्मा, वर्षा चाचरा, ममता दलाल, भारती पांडे, पूजा ढोमणे उपस्थित होते.

शिवसेना
शिवसेनेच्या वतीने गणेशपेठ बसस्थानक परिसरात मिठाईचे वितरण करण्यात आले. यावेळी श्याम नलोडे, वसंता डोंगरे, शेखर खरवडे, उमेश निकम, अजय मने, पिंटू ढोबळे, चंद्रकांत कावडे, विक्रम सावळे, प्रल्हाद साहू, चंद्रकांत नासरे, सागर श्रीवास, पंकज खडसे, संजय नारेकर, वैभव धरमे, रोहित वाघ उपस्थित होते.

भारतीय नागरिक संघर्ष मंच
मंचाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ओमप्रकाश सोमकुवर, मनोहर फुकट, हरिहर उदापुरे, नीळकंठ आंबोरे, शंकर महाजन, प्रीती टेटे, विजय बारापात्रे, शेख रफीक, ज्योती देशमुख उपस्थित होते.

सम्यक बहुउद्देशीय संस्था
संस्थेच्या वतीने टाकळी सीम हिंगणा रोड येथे स्वयंदीप बुद्धविहारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला नगरसेवक विकास ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल पखिड्डे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नगरसेविका उज्ज्वला बनकर, मुकुंद भगत, हरीश भगत, श्रावण उके, मनोहर जामगडे, शामराव पखिडे, प्रेमचंद बनकर, विकास गणवीर, रूपचंद ढोले, दिनेश ढोके, कुंदा डांगरे, तक्षशीला भगत, अंतकला गणवीर, श्यामकला भगत, विमला मेश्राम, रत्नमाला भगत, मीरा उके उपस्थित होते.

भारतीय आयुर्विमा महामंडळ
नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनतर्फे कस्तूरचंद पार्क येथील एलआयसी चौकात प्याऊचे लोकार्पण वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक आर. चंदर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश पाटणे, टी. के. चक्रवर्ती, धनराज डोंगरे, अनिल ढोकपांडे, ए. के. पांडा यांनी आपले विचार व्यक्त केले. संचालन अनिल ढोकपांडे यांनी केले. आभार नरेश अडचुले यांनी मानले. यशस्वितेसाठी मिलिंद कुमार, अशोक रामटेककर, वाय. आर. राव, शिवा निमजे, मनोहर पवनीकर, जी. हरी वर्मा, आर. डी. जाधव, राजेश विश्वकर्मा, नेहा मोटे, अभय पाटणे यांनी परिश्रम घेतले.

नागपूर शहर काँग्रेस कमिटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेत व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सरचिटणीस प्रफुल्ल गुडधे, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, महिला अध्यक्ष प्रज्ञा बळवाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके, नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, तनवीर अहमद, देवा उसरे, मिलिंद सोनटक्के, दीपक कापसे, किशोर जिचकार, कृष्णकुमार पांडे, तानाजी वनवे, डॉ. सूर्यकांत भगत, बंडोपंत टेंभुर्णे, उमेश शाहू, विजय बाभरे, रत्नाकर जयपूरकर, चंद्रकांत बडगे, परमेश्वर राऊत, संदेश सिंगलकर, अजय हिवरकर, रामकुमार मोटघरे, विजय पखाले, दयाल जसनानी, स्मिता कुंभारे, इंद्रसेन ठाकूर, सदन यादव, बाबा वकील, घनश्याम मांगे, प्रभाकर खापरे, पंकज थोरात, पंकज निघोट, प्रसन्ना जिचकार, सतीश देऊळकर, ओवेस कादरी, रिचा जैन, स्नेहल दहीकर, अंजली मडावी, हिराताई बडोदेकर, संध्या ठाकरे, लीला म्हैसकर, मिलिंद चौरसिया आदी उपस्थित होते.

संविधान चौक सौंदर्यीकरण समिती
संविधान चौक सौंदर्यीकरण समितीच्यावतीने संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््यास २५ किलोचा गुलाबाचा हार समितीचे अध्यक्ष मिलिंद खैरकर यांनी अर्पण केला. कार्यक्रमाला चंदू बागडे, अनिल रामटेके, दिगांबर चनकापुरे, शुद्धोधन तांबे, जयंत शेंडे, अनिल शील, गौरव कोंबाडे, गणेश हुमणे, अनिल वैरागडे, माणिकलाल बांबोर्डे उपस्थित होते.

परमाणु खनिज अन्वेषण व अनुसंधान निदेशालय
भारतीय जीवन विमा निगमचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी बी. डी. नानवटे व प्रधान वैज्ञानिक डॉ. त्रिलोक हजारे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ओमप्रकाश यादव, संध्या चौव्हाण, कविता चोपडे यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खोब्रागडे)
पक्षाचे शहर अध्यक्ष असंघ रामटेके यांच्याहस्ते संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी सुरेख खापर्डे, पद्माकर दहीकर, दिलीप शेंडे, कौशिक रामटेके, लंकेश गजभिये, बाल्या मेश्राम, सुरेश फुलझेले, चरणदास उके, उमाकांत रामटेके, घनश्याम गणवीर, स्वाती खोब्रागडे, नितू नारनवरे, मीना गेडाम उपस्थित होते.

नागपूर शहर काँग्रेस सेवादल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर शहर काँग्रेस सेवादलातर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली. संविधान चौकातील बाबासाहेबांच्या प्रतिमेला रामगोविंद खोब्रागडे यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कृष्णकुमार पांडे, यशवंत कुंभलकर, स्मिता कुंभारे, दादाराव डोंगरे, रत्नमाला पोफरे, सतीश तारेकर, गोविंद उरकुडे, प्रभूदास तायवाडे, मनोज वाळके, सिद्धार्थ ढोके, सुरेश सिंगुरवार, खुर्शीद अहमद अन्सारी, मच्छींद्र जीवने, नामदेव लाडीकर, फुलवंती साखरे, दमयंती पुनवटकर, ऐश्वर्या देशपांडे, मीनाक्षी साखरे आदी उपस्थित होते.

बहुजन हिताय संघ
संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बहुजन हिताय संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या वतीने माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शशिकांत हुमणे, डॉ. बालचंद्र खांडेकर, डॉ. एस. के. गजभिये, हंसराज भांगे, सुरेश बोरकर, एस. टी. चव्हाण, ए. एस. वासनिक, बी. टी. वाहणे, ज्ञानेश्वर रामटेके, तुषार वालदे, वंदना सहारे आदी उपस्थित होते.

Web Title: Jai Bhim's alarm in all over the sub-principality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.