‘जय जिनेंद्र’, ‘जय जिनेंद्र’ बोलो ! नागपुरात २६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 09:49 PM2019-04-17T21:49:12+5:302019-04-17T22:09:41+5:30

भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवारी शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. जैन समाजातर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा, सजवलेले चित्ररथ यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. विविध जैन मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. मंदिरांमध्ये पंचामृत अभिषेक पूजन करण्यात आले.

'Jai Jinendra', 'Jai Jinendra' Bolo ! In Nagpur celebrated 2618th birth anniversary of Lord Mahavir | ‘जय जिनेंद्र’, ‘जय जिनेंद्र’ बोलो ! नागपुरात २६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव साजरा

‘जय जिनेंद्र’, ‘जय जिनेंद्र’ बोलो ! नागपुरात २६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव साजरा

googlenewsNext
ठळक मुद्देभव्यदिव्य शोभायात्रा : जागोजागी जल्लोषात स्वागतभगवान महावीर यांचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवारी शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. जैन समाजातर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा, सजवलेले चित्ररथ यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. विविध जैन मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. मंदिरांमध्ये पंचामृत अभिषेक पूजन करण्यात आले.
श्री जैन सेवा मंडळ 


श्री जैन सेवा मंडळातर्फे भगवान महावीर यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. याअंतर्गत रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात भगवान महावीर जन्मकल्याणक तसेच अभिषेक, पूजन करण्यात आले. त्यानंतर सुश्रावक श्री गुरुभक्तांतर्फे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री सैतवाल जैन सामाजिक महिला मंडळातर्फे ध्वजगीत सादर करण्यात आले. भगवान महावीर यांच्या उपदेश व विचारांना घराघरापर्यंत पोहोचविण्याचा जैन समाजातील नागरिकांनी संकल्प घ्यावा, असे आवाहन मुनिश्री प्रथमसागर महाराज, मुनिश्री सुयशसागर महाराज, प.पू. प्रवचन प्रभावक मुनिराज श्री प्रशमरतिविजय म.सा.आणि पूजनीय आर्यिका माताजी यांनी केले. 

तत्पूर्वी रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी यांनी दीप प्रज्वलन करून जन्मकल्याणक महोत्सवातील इतर कार्यक्रमांचे उद्घाटन केले. यावेळी माजी खासदार अजय संचेती, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, सुमतलल्ला जैन, अर्चना जैन, श्री वर्धमान स्थानक जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल कटारिया, उद्योगपती दिलीप जैन, सुरुची उद्योगाचे सुभाषचंद जैन, आदित्य होंडाचे प्रकाशचंद्र जैन, पुनीत पोद्दार, इंदरचंद पाटणी, दिलीप रांका हे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप गांधी, अजय शहाकार, कमलराज धाडीवाल, इंद्रनाथ भागवतकर, विजय झवेरी, संतोष देवडिया, दीपक शेंडेकर, संजय सावनसुखा, देवेंद्र कोठारी, सुरेंद्र कोठारी, भरत आसाणी, मुकेश सिंहावत्र, गौरव शहाकार, मनोज जैन, संजय टक्कामोरे, दीपक झवेरी, दिलीप जैन, घनश्याम मेहता, इंदरचंद जैन (पेटीस), किशोर बेलसरे, सुरेश डायमंड, सुमत लल्ला जैन, पवन झांजरी, महिला समितीच्या अध्यक्षा रजनी जैन, कश्मीरा पटवा, आशा झवेरी, राखी शाह यांचीदेखील उपस्थिती होती.
अहिंसा यात्रेचे जागोजागी स्वागत
श्री जैन सेवा मंडळ तसेच महावीर यूथ क्लब, नागपूर यांच्यातर्फे बुधवारी सकाळी भव्य अहिंसा रथयात्रा काढण्यात आली. या यात्रेत २४ तीर्थंकरांचे चित्ररथ सादर करण्यात आले. रथयात्रेचे जागोजागी पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. परवारपुरा दिगंबर जैन मंदिर येथून यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर शहीद चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल, कल्याणेश्वर मंदिर, झेंडा चौक या मार्गाने रेशीमबागस्थित कविवर्य सुरेश भट सभागृहात पोहोचली. यात्रेच्या यशस्वीतेसाठी महावीर यूथ क्लबचेअध्यक्ष दिनेश सावलकर, सचिव प्रशांत मानेकर, बाहुबली पळसापुरे, विशाल चाणेकर, सोनू सिंघई, गौरव अवथनकर, श्रीकांत तुपकर इत्यादी सदस्यांचे सहकार्य लाभले. रथयात्रेच्या माध्यमातून जनजागृतीदेखील करण्यात आली.
साथ फाऊंडेशनने केले शोभायात्रेचे स्वागत
श्री महावीर जन्मकल्याणक महोत्वसानिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत साथ फाऊंडेशनतर्फे करण्यात आले. यावेळी राजू जैन, बबलू जोशी मित्र परिवारातर्फे पुष्पवर्षाव करण्यात आला तसेच शीतपेयांचे वितरण करण्यात आले. यावेळी राजेश पांडे, लखन श्रीवास, गुड्डू मौर्य, शिवपाल कुकवास, राजू पालीवाल, राजेश जोशी, रिंकू जैन, किशोर सिद्धपार, सुनील पराते, इंदर विशाल जैन, नीलेश भूपतानी, प्रशांत नायक, बंटी जैन, शैलेंद्र जैन, ऋषी जैन, आनंद वाजपेयी, योगेश जैन इत्यादी उपस्थित होते.
दिगंबर जैन मंदिर, लक्ष्मीनगर
लक्ष्मीनगरस्थित दिगंबर जैन मंदिरातर्फे भगवान महावीर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सकाळपासूनच मंदिरात जैन भाविकांची गर्दी होती. यावेळी अभिषेकदेखील करण्यात आला. शोभायात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी मंदिरासमोर वाद्यवादनदेखील करण्यात आले.
पुलक मंच परिवाराचा चित्ररथ
अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच महावीर वॉर्ड नागपूरद्वारे चारित्र चक्रवर्ती आचार्यश्री शांतिसागरजी महाराजांच्या मुनी दीक्षा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने चित्ररथ काढण्यात आला. राष्ट्रीय सांस्कृतिक मंत्री मनोज बंड यांच्या संयोजनात चित्ररथ काढण्यात आला. दरम्यान, श्री जैन सेवा मंडळ नागपूरद्वारा भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी विशाल शोभायात्रा काढण्यात आली. चित्ररथासमवेत शाखा अध्यक्ष शरद मचाले, मनोहरराव उदेपूरकर, कुलभूषण डहाळे, पंकज बोहरा, रमेश उदेपूरकर, नरेश मचाले, सुरेश महात्मे, प्रकाश उदापूरकर, अनंतकुमार शिवणकर, नितीन रोहणे, प्रशांत मानेकर, नीलय मुधोळकर, अमोल भुसारी, सूरज जैन पेंढारी, सचिन जैन, शांतिनाथ भांगे, प्रभाकर मानेकर, विजय कापसे, प्रमोद राखे, छाया उदापूरकर, मंगला शिवणकर, शीला भांगे, मनीषा नखाते, प्रिया बंड, शुभांगी लांबाडे, स्वाती महात्मे, मनीषा रोहणे, सुनंदा मचाले, वैजयंती कापसे, आरती महात्मे, पूजा मोदी, ज्योती भुसारी आदी उपस्थित होते.
सैतवाल जैन मंदिर
इतवारी शहीद चौक येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाल जैन मंदिर संस्था येथे भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या २,६१८ व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पंचामृत अभिषेक पूजन करण्यात आले. पं.हीरासाव कहाते यांनी पूजन विधी केले. यावेळी अध्यक्ष दिलीप शिवणकर, दिलीप राखे, दीनानाथ वाकेकर, सुधीर सिनगारे, चवडे यांनी कलशांनी अभिषेक केला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: 'Jai Jinendra', 'Jai Jinendra' Bolo ! In Nagpur celebrated 2618th birth anniversary of Lord Mahavir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.