नवीन वीज प्रकल्पांच्या विरोधात जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मुंडन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 21:30 IST2023-06-17T21:30:29+5:302023-06-17T21:30:52+5:30
कोराडीच नव्हे तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प स्थापित करण्यात येऊ नये तसेच १ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेली वीज दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुंडन केले.

नवीन वीज प्रकल्पांच्या विरोधात जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मुंडन
नागपूर : कोराडीच नव्हे तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प स्थापित करण्यात येऊ नये तसेच १ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेली वीज दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुंडन केले. संविधान चौक येथे कार्यकर्ते मागील १३ जूनपासून आंदोलन करीत आहेत. शुक्रवारी त्यांनी वीज बिलाची होळी करीत दरवाढीचा निषेध केला होता.
मुंडन करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मुकेश मासूरकर, नरेश निमजे, विजय मोंदेकर, अशफाक रहमान, तारेश दुरुगकर, नीलकंठ अंभोरे यांचा समावेश आहे. आवश्यकता नसतानाही कोराडीमध्ये नवीन वीज युनिट उभारले जात आहे. यामुळे परिसरात प्रदूषण आणखी वाढेल, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनात अरुण केदार, विष्णुपंत आष्टीकर, अरविंद भोसले, प्रभाकर कोंडबत्तूनवार, ज्योती खांडेकर, मृणाल मोरे, शोभा येवले, नीलिमा सेलूकर, माधुरी चौहान आदींचा समावेश होता.