नागपुरात सरकार विरोधात आयटकचे जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:15 AM2018-09-09T00:15:50+5:302018-09-09T00:21:44+5:30
केंद्र सरकारने अंगणवाडी, आशा, पोषण आहार योजनेच्या बजेटमध्ये २०१४ पासून सातत्याने कपात सुरू केली आहे. अंगणवाडी प्रकल्पाची ६० टक्क्याची तरतूद २५ टक्क्यावर आणली आहे. आशा व पोषण आहार योजनेचे बजट कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम लाभार्थ्यांवर होत आहे. ५० टक्के अंगणवाड्या बंद होणार असून, राज्यात एक लाखावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेरोजगार होणार आहे. सरकार कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे संविधान चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने अंगणवाडी, आशा, पोषण आहार योजनेच्या बजेटमध्ये २०१४ पासून सातत्याने कपात सुरू केली आहे. अंगणवाडी प्रकल्पाची ६० टक्क्याची तरतूद २५ टक्क्यावर आणली आहे. आशा व पोषण आहार योजनेचे बजट कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम लाभार्थ्यांवर होत आहे. ५० टक्के अंगणवाड्या बंद होणार असून, राज्यात एक लाखावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेरोजगार होणार आहे. सरकार कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे संविधान चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे सचिव शाम काळे यांनी केले. या आंदोलनात जयवंत गुरवे, हरिशचंद्र पवार, अरुण वनकर, वनिता कापसे, ज्योती अंडरसहारे, अनिता गजभिये, प्रीती राहुलकर, जयश्री चहांदे, शीला भोयर, आशा पाटील, विद्या गजभिये, योगीता नवघरे, सुनीता काकडे, गजानन घोटे, मोहन बावने, शरद पिंपळे आदी सहभागी झाले होते. आंदोलनात ८८८ कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतल्याचे शाम काळे यांनी सांगितले.