नागपुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:08 PM2019-02-13T23:08:00+5:302019-02-13T23:08:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील ५० टक्के अंगणवाडी बंद करून खासगी संस्थांना देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. शिवाय ...

Jail Bharo movement of the Aanganwadi workers in Nagpur | नागपुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

नागपुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना वाढीव १५०० रुपये मिळावे : सेवा समाप्ती लाभात तिपटीने वाढ करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील ५० टक्के अंगणवाडी बंद करून खासगी संस्थांना देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्टेंबर २०१८ रोजी घोषणा केल्यानुसार अजूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढीव १५०० रुपये मिळाले नाही. ही कर्मचाऱ्यांची फसवणूक असून त्याविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी संविधान चौकात रस्ता रोको व जेलभरो आंदोलन केले. यावेळी हजारापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते.
आंदोलन आयटकच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे करण्यात आले. सर्व कर्मचाºयांना पोलीस लाईन टाकळी येथे नेऊन पुन्हा संविधान चौकात सोडण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १५०० रुपये मिळाले नाहीत. त्यानंतरही केंद्रीय बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १५०० रुपये देण्याची घोषणा केली. त्यानुसार ३ हजार रुपये मिळेल, असा कर्मचाऱ्यांचा अंदाज होता. पण राज्य सरकारने अजूनही एक रुपयाही दिलेला नाही. घोषणेनुसार आशा वर्कर्सला घोषणेनुसार १ हजार रुपये मिळाले. याउलट राज्य सरकार राज्यातील २ लाख ८ हजार अंगणवाड्यांपैकी अर्ध्या बंद करून खासगी संस्थांना देणार आहे. त्यामुळे १ लाख ४ हजार कर्मचारी आणि १ लाख ४ हजार आशा वर्कर्स बेरोजगार होणार आहे. अंगणवाडी बंद करण्यात येऊ नये, शिवाय कर्मचाऱ्यांचा घोषणेनुसार वाढीव १५०० रुपये सरकारने द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा देत मागण्यांचा पुनरूच्चार केला. सेवासमाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करणे, ३० एप्रिल २०१४ नंतर सेवा समाप्त करण्यात आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती लाभाची रक्कम मिळावी, मानधनाच्या अर्धी पेन्शन देणे, अंगणवाडी कर्मचाºयांना पेन्शन योजना लागू करणे, विमा योजनांची अंमलबजावणी करणे, टीएडीएची रक्कम देणे, पाच व दहा वर्षांच्या वाढीव मानधनाची रक्कम फरकासह देणे, योजनेच्या कामासाठी लागणारे रजिस्टर्स व अहवाल फॉर्म देणे, आजारपणाची एक महिन्याची पगारी सुटी देणे, सर्व अंगणवाडी केंद्रांना चांगल्या प्रतीचे वजनकाटे देणे, राष्ट्रीय कामाच्या नावाखाली योजनाबाह्य कामे देऊ नये, रिक्त जागांवर अंगणवाडी सेविका व मदतनिसांची नियुक्ती करणे, अंगणवाडीच्या अतिरिक्त कामासाठी मानधनाच्या ५० टक्के रक्कम देणे, विनाशुल्क वैद्यकीय तपासणीचे आदेश आरोग्य केंद्राला देणे, मिनी अंगणवाडी केंद्राला प्रशासकीय खर्च देणे, कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करू नये, आदी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.
आंदोलनात आयटक महाराष्ट्रच्या सरचिटणीस श्याम काळे, जिल्हा अध्यक्ष ललिता कडू, सचिव रेखा कोहाळ यांच्यासह वनिता कापसे, उषा चाटभे, ज्योती अंडरसहारे, मनिषा मुनघाटे, अनिता गजभिये, शालिनी मुऱ्हारकर, करुणा साखरे, करुणा मेश्राम, कल्पना शेवाळे, रचना भुसारी, आशा भोयर, आशा पाटील, मंगला रंगारी, विद्या गजभिये, शैला काकडे, संतोषी नेवारे, आशा बोंडे, लता भड,लता भिमे, ज्योती लोहे, मंगला चामट, अर्चना काटोले, जयरी चहांदे, नलू मेश्राम, चंद्रप्रभा राजपूर, कीर्ती टाकळखेड यांच्यासह हजारो कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Jail Bharo movement of the Aanganwadi workers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.