नागपुरात  सब्बल मारणाऱ्याला सहा वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 10:56 PM2018-02-01T22:56:06+5:302018-02-01T22:57:45+5:30

Jailed for six years in Nagpur |  नागपुरात  सब्बल मारणाऱ्याला सहा वर्षांचा कारावास

 नागपुरात  सब्बल मारणाऱ्याला सहा वर्षांचा कारावास

googlenewsNext
ठळक मुद्देसत्र न्यायालय : यशोधरानगरमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सब्बल मारून दाम्पत्यास गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी सहा वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी हा निर्णय दिला. ही घटना यशोधरानगर येथे घडली होती.
सुरेश जुनघरे (४८) असे आरोपीचे नाव असून, तो धम्मदीपनगर झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. २४ मे २०१४ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपीने सुखदेव रामटेके (५०) व त्याची पत्नी शांता (४०) यांना जुन्या भांडणावरून सब्बलने मारले होते. आरोपीला २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक आर. ए. पुरी यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात शासनातर्फे अ‍ॅड. गिरीश दुबे यांनी बाजू मांडली.

Web Title: Jailed for six years in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.